सोलापूर

अक्कलकोटमध्ये दिवसभरात सापडले 31 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट(सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आज सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. त्यात अक्कलकोटला रॅपिड अँटीजन टेस्ट मधून 25 तर स्वॅब टेस्ट मधून 6 पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत, एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 31 झाल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. 

आज सकाळी स्वॅब टेस्ट मध्ये पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांसाठी आज मिळालेल्या अहवालानुसार निगेटिव्ह अहवाल 61, कोरोनाबधित अहवाल 06, स्वॅब रद्द अहवाल 02,तर प्रलंबित अहवाल 01 यांचा समावेश आहे. 

यानुसार मैंदर्गी 03,भोसगा 02 व नागनहळ्ळी 01 येथील रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज घेतलेल्या 145 रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 25 पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. ज्यात जेऊरवाडी (01), तडवळ (05),मैंदर्गी (05),संगोगी (आ) (01),किणी (03) असे ग्रामीण भागातील रुग्ण तर खासबाग (03) व भारत गल्ली (07) असे दहा रुग्ण आढळून आलेले आहेत. या प्रमाणे आज एकूण 31 पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. 
आजपर्यंत तीन दिवसात एकूण 400 रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आले आहे त्यामधून एकूण 88 पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे शंकीत रुग्णांवर तातडीने इलाज करणे शक्‍य होत आहे. या टेस्टमूळे रुग्ण गंभीर स्थितीत जाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. आता कोरोनाबधित रुग्णांचा फैलाव हा प्रत्येक ग्रामीण भागातील गावात पसरताना आणि वाढताना दिसत आहे. सगळ्यात जास्त रुग्ण हे अक्कलकोट शहरानंतर मैंदर्गी येथे आढळून आले आहेत. रुग्ण हा कोरोनाबधित होण्याअगोदर त्याचे विलगीकरण करणे त्याचे स्वॅब घेणे तसेच त्याचा अहवाल तीन दिवसानी येणे या गोष्टीत सहज आठवडा वेळ जायचा त्यामुळे त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधून त्यांचा तपास करणे यात बराच वेळ जायचा पण आता या रॅपिड अँटीजन टेस्टने अगदी वेळेवर इलाज होण्यास मदत होत आहे 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT