भाजपच्या 30 टक्‍के नगरसेवकांच्या तिकिटाला लागणार कात्री! Sakal
सोलापूर

भाजपच्या 30 टक्‍के नगरसेवकांच्या तिकिटाला लागणार कात्री!

भाजपच्या 30 टक्‍के नगरसेवकांच्या तिकिटाला लागणार कात्री!

सकाळ वृत्तसेवा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 90 टक्‍के नगरसेवक पास असल्याचा अहवाल दिला असला तरी, पक्षीय धोरणांच्या परीक्षेत मात्र 75 टक्‍केच निकाल लागला आहे.

सोलापूर : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी 90 टक्‍के नगरसेवक पास असल्याचा अहवाल दिला असला तरी, पक्षीय धोरणांच्या परीक्षेत मात्र 75 टक्‍केच निकाल लागला आहे. त्यामुळे 30 टक्‍के विद्यमान नगरसेवकांच्या तिकिटाला कात्री लागणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये दक्षिण मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या अधिक असल्याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेच्या आजपर्यंतच्या निवडणुकीत कॉंग्रेसविरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळाली आहे. महापालिकेतील सदस्यांची आकडेवारी पाहता, शहरात भाजप व कॉंग्रेस हे दोन पक्ष मोठे ठरले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने सुरू केलेले "मिशन इनकमिंग'मुळे राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असेच वातावरण शहरात सध्या तरी पाहायला मिळत आहे. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात दादांनी नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक तयार असल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षात नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांसह पक्षासोबत केलेल्या गद्दारीचा सात-बारासह अहवाल तयार असल्याचे सूचक व्यक्‍तव्यही त्यांनी मेळाव्यात केले. यामध्ये 90 टक्‍के नगरसेवक पास असल्याचा खुलासा त्यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात प्रदेश स्तरावरील प्रगतिपुस्तक स्थानिक स्तरावर किती उपयोगात येणार आहे, हा संशोधनाचा विषय असणार आहे.

भाजपच्या प्रगतिपुस्तकाचा खरा लेखाजोखा होणे मुश्‍कील आहे. काही नगरसेवकांना स्वत:ची प्रगती माहिती असल्याने ते स्वत:हून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारी आहेत. तर पक्षीय धोरणांत न बसणाऱ्या नगरसेवकांची यादी पक्षाने तयार केली आहे. सध्या महापालिकेत भाजपचे 51 नगरसेवक आहेत. यापैकी 16 नगरसेवकांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या ही दक्षिण मतदारसंघातील असल्याचे समजते. मागील निवडणुकीत भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आणि नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यामुळे जुने कार्यकर्ते नाराजी व्यक्‍त करून काही काळ पक्षापासून दूर राहिले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा पक्षाशी नाळ जोडत पक्षश्रेष्ठींकडे ऊठबैस वाढविली आहे. तर दोन देशमुखांच्या गटबाजीत आपली पोळी भाजून घेतलेले विद्यमान नगरसेवक पुन्हा तिकीट मिळविण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करीत आहेत. मात्र 51 पैकी 16 जणांचे तिकीट कट होणार असल्याने हे 16 नगरसेवक कोण? याचा शोध घेण्यासाठी भाजपसह विरोधी पक्षातील विद्यमान नगरसेवकांची कस लागत असल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT