तात्या लांडगे
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा २१ वा उन्मेष सृजनरंगाचा युवा महोत्सव सांगोला येथील सांगोला महाविद्यालयात ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत रंगणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.
विद्यापीठाने युवा महोत्सव आयोजनासाठी विद्यार्थी विकास विभागाकडून महाविद्यालयांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार यंदाचा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात घेण्याचे निश्चित झाले आहे. युवा महोत्सवात नृत्य, नाट्य, लोककला, ललित, वाड;मय, संगीत विभागातील एकूण ३९ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील जवळपास दोन हजार विद्यार्थी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवात लावणी, समूह गायन (भारतीय), कातरकाम, मूक अभिनय, प्रश्नमंजुषा (लेखी), वक्तृत्व मराठी, भारुड, काव्यवाचन, भित्तीचित्रण, मेहंदी, भजन, एकांकिका, शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, वक्तृत्व इंग्रजी, पथनाट्य, स्थळचित्रण, लोक वाद्यवृंद, जलसा, स्थळ छायाचित्रण, पोवाडा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, वक्तृत्व हिंदी, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा होणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या उत्साह आणि आनंदाला उधाण येते. मागील अनेक वर्षापासून युवा महोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत असून यामुळे चांगले कलाकार घडत आहेत. या महोत्सवाचे विद्यार्थी विकास विभागाकडून सूक्ष्म नियोजन केले जाते. या युवा महोत्सवात विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले आहे.
विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलणार?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विद्यापीठाचा युवा महोत्सव याच काळात होणार असल्याने परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार की पुढे जाणार, याचा निर्णय उद्या (शुक्रवारी) होणार आहे. त्यावर परीक्षा नियंत्रकांची कुलगुरू, प्र कुलगुरूंसमवेत बैठक होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.