कोरोना लस  File photo
सोलापूर

कोरोनातून बरे झालेल्यांना घेता येईल तीन महिन्यांनंतर लस !

कोरोना आजारातून बरे झालेल्यांना तीन महिन्यांनंतर लस घेता येईल

तात्या लांडगे

लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी करू शकता रक्‍तदान; कोरोनातून बरे झालेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही रक्‍तदान शक्‍य

सोलापूर : कोरोनाच्या लसीचा (Corona Vaccine) तुटवडा भासत असतानाच आता लस कोणाला आणि किती दिवसांनी द्यावी, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी नवे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्ण आजारातून बरा झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्याला कोरोनाची लस द्यावी, तर लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्‍ती रक्‍तदान (Blood Donation) करू शकतो, असे आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव (Health Officer Dr. Sheetal Kumar Jadhav) यांनी स्पष्ट केले आहे. (Those who recover from corona disease can be vaccinated after three months)

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा डोस टोचला जाणार असून, ऑनलाइन पोर्टलवर तसा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या आत कोणालाही दुसरा डोस देता येत नाही. आतापर्यंत शहरातील एक लाख 25 हजार तर ग्रामीणमधील दोन लाख 68 हजार व्यक्‍तींना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर शहरातील 39 हजार तर ग्रामीणमधील सुमारे 66 हजार व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यभर लसीचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर आता उपलब्ध लसीतून पहिल्या डोससाठी 30 टक्‍के तर उर्वरित लस दुसऱ्या डोससाठी वापरण्याचेही नवे निर्देश विभागीय आयुक्‍तांनी दिले आहेत. आता पुण्यावरून मिळणाऱ्या एकूण लसीतील 40 टक्‍के लस शहरासाठी तर उर्वरित 60 टक्‍के लस ग्रामीण भागासाठी वापरली जात आहे. कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी लस घेता येईल, लस घेतल्यानंतर रक्‍तदान करता येईल का, पहिला डोस घेतला आणि कोरोना झाला तर कधीपर्यंत लस घेता येत नाही, असे विविध प्रश्‍न नागरिकांसमोर होते. त्यावर जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी नवे पत्र काढून त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नव्या आदेशानुसार...

  • कोरोनातून बरे झालेल्यांना तीन महिन्यांनंतर द्यावी लस

  • ज्यांना ऍन्टीबॉडीज तथा प्लाझ्मा दिला आहे, त्यांनाही तीन महिन्यांनंतरच लस टोचावी

  • पहिला डोस घेतल्यानंतर व दुसरा डोस टोचण्यापूर्वी कोरोना झालेल्यांना बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी द्यावी लस

  • कोणत्याही गंभीर आजारामुळे अतिदक्षता कक्षात उपचार घेतलेल्यांना चार ते आठ आठवड्यांनंतर लस द्यावी

  • लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी करू शकता रक्‍तदान; कोरोनातून बरा झालेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही रक्‍तदान शक्‍य

  • स्तनपान करणाऱ्या महिलांना लस टोचता येईल; लसीकरणापूर्वी कोरोना टेस्टची सक्‍ती नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

Satara Accident : शिरवळ–लोणंद रस्त्यावर भीषण अपघात; वीर धरणाजवळ दोन कारची समोरासमोर धडक; एक ठार, सात गंभीर!

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Solapur News : शेतकऱ्यांच्या तक्रारीला यश; आमदार खरे यांच्या हस्तक्षेपाने लांबोटी विद्युत केंद्रातील अभियंता निलंबित!

Latest Marathi News Live Update : महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

SCROLL FOR NEXT