WIT Mahavir Jayanti 
सोलापूर

लॉकडाउनमध्ये "या' माध्यमातून महावीर जयंती महोत्सवात हजारोंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या विद्यार्थी वसतिगृहातील जैन मंदिरात सोमवारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजता या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याचा लाभ जगभर पसरलेले डब्ल्यूआयटीच्या हजारो विद्यार्थी आणि लाखो जैन बांधवांनी आपापल्या घरी बसून घेतला.

आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने वापर
इसवीसन पूर्व 599 मध्ये मगद प्रांतातील वैशाली नगरीत भगवान महावीरांचा जन्म झाला. त्या वेळी स्वर्गातून इंद्रदेव भूतलावर येऊन उत्सव साजरा केला केला. त्याचे प्रतीक म्हणून चैत्र शुक्‍ल त्रयोदशीला हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वालचंद शिक्षण समूहातही हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु यंदाच्या कोरोना विषाणूच्या महामारीमुळे चारपेक्षा अधिकजण मंदिरात जमणार नाहीत याची काळजी महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीने उपयोग करीत या महोत्सवात सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो भाविकांना सामावून घेण्यात आले.

मंत्रोच्चारात झाले धार्मिक विधी
मंदिरात प्रारंभी स्वामींच्या प्रतिमेस अभिषेक करण्यात आला. हे विहंगम दृश्‍य आपल्या मोबाईलद्वारे फेसबुकच्या माध्यमातून पाहणाऱ्या हजारो भाविकांनी लाईकच्या स्वरूपात डब्ल्यूआयटीला मनापासून धन्यवाद दिले. मंत्रोच्चारात स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विश्‍वकल्याणासाठी प्रतिक्रमण पाठ दिला. या महामारीतून सर्व जिवांचे रक्षण होवो, सर्व जिवांचे कल्याण होवो, या भावनेने भगवान महावीरांच्या "जगा आणि जगू द्या' या सिद्धांताचे विश्‍लेषण यानिमित्ताने प्रा. डॉ. महावीर शास्त्री यांनी केले. या वेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्‍वस्त पराग शहा उपस्थित होते.

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT