Quaidi
Quaidi 
सोलापूर

धक्कादायक : "या' सबजेलमधील तीन कैद्यांचे पलायननाट्य ! अखेर पोलिसांनी केले शिताफीने जेरबंद

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : न्यायालयाची बंदी असताना येथील सब जेलमधील तीन कैद्यांनी कौलारूखालील लाकडी आडूला असणारी संरक्षित खिडकी वाकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना पुन्हा जेरबंद व्हावे लागले. कैद्यांच्या पलायन नाट्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नामदेव कोळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

संजय बाळकृष्ण शिरगावे (वय 40, रा. गंगावेस, कोल्हापूर), कृष्णा गोटीराम काळे (वय 22, रा. कोरफडी, ता. बार्शी), राजा मधुकर पवार (वय 19, रा. पेनूर, ता. मोहोळ) या आरोपींवर पंढरपूर व इतर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. असे असताना या तिघांनी आज (सोमवारी) पहाटे सव्वा तीनच्या दरम्यान येथील सब जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे कैदी पळून गेल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने पथकाची नियुक्ती करून त्यांना या पळून गेलेल्या कैद्यांच्या मागावर लावण्यात आले. किल्ला भाग परिसरातून दोघांना जेरबंद करण्यात आले व राजा मधुकर पवार यास त्याच्या लोकेशनवरून शहरापासून काही अंतरावर ताब्यात घेण्यात आले. 

सध्या कोरोनाच्या संकटामध्ये येथील सब जेलमध्ये असणाऱ्या 40 कैद्यांमधील 28 कैदी रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले. तर निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या 12 कैद्यांना तहसील कार्यालयाच्या नवीन सब जेलमध्ये ठेवण्यात आले. सब जेलमधून कैदी पळून जाण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या असताना देखील पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे, अशांना पळून जाण्याची संधी मिळत आहे. सध्या कैदी आणि पोलिस खात्याला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे कैदी व पोलिस तणावात वावरत आहेत. अशा परिस्थितीत कैद्यांनी केलेले धाडस हे पोलिस खात्याला आव्हानात्मक ठरले असले, तरी पोलिसांनी देखील तितक्‍याच ताकदीने त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT