vangi lagwad.png 
सोलापूर

सोळा गुंठे जमिनीत वांगी लागवडीतून मिळवले तीन लाखांचे उत्पन्न 

हुकूम मुलानी

मंगळवेढा(सोलापूर)ः तालुक्‍यातील भाळवणी येथील शेतकरी तुकाराम रोंगे यांनी केवळ सोळा गुंठे जमिनीत वांगी लागवड करत तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 
कोरोनाच्या संकटात शेती उत्पादनाच्या विक्रीसह सर्व व्यवसाय थांबले. अशातच तालुक्‍यातील दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या भाळवणी येथील तुकाराम रोंगे शेतकऱ्याने लागवड व ग्राहकांना थेट विक्रीतून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. 

सध्या जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकाची लागवड करून उत्पन्न हाती येईपर्यंत करावा लागणारा खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला त्यामुळे अशा जादा उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड न करता जीवनावश्‍यक, व्यवसायिक, लगेच उत्पन्न देणारी व्यवसायिक पिके करण्यावर भर देण्याचा तालुक्‍यात वाढला. अशाच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त साधून उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन अजित 11 या जातीचे वांग्याच्या रोपाची 16 गुंठ्यात लागवड केली. 

त्यामुळे वांग्यावर कोणत्याही आळीचा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तीन दिवसाआड फवारणी करत वांग्याचे उत्पन्न थेट लॉकडाऊन काळात सुरू झाले. परंतु कोरोनाच्या भीतीने लोक घरात बसून राहिल्यामुळे उत्पादित केलेल्या वांग्यासाठी बाजार शोधणे हे संकटाचे ठरले. अशा परिस्थितीत उत्पादन ते थेट ग्राहक ही भूमिका ठेवत प्रत्येक घरोघरी दुचाकीवर जाऊन वांगी विकण्याचा उद्योग सुरू केला. परंतु फक्त वांग्याला ग्राहक कमी मिळणार हे ओळखून इतर दोन-तीन शेती उत्पादने सोबतीला घेऊन त्यातून मालाची विक्री सुरू केली. 
त्यामुळे थेट ग्राहकाला ताजा आणि स्वस्त दरात वांगी विक्री केल्यामुळे वांग्याच्या प्रत्येक कॅरेटला जवळपास हजार रुपये मिळू लागले. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे बाजार समितीमधील लिलाव प्रक्रियेत ही वांगी विकण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये प्रत्येक कॅरेटला चारशे पासून ते सोळाशे रुपये पर्यंतचा दर मिळाला. त्यामुळे एकूणच जवळपास सोळा गुंठे क्षेत्रात केलेल्या वांग्यातून जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. यासाठी कष्टाची तयारी ठेवल्यामुळे सर्व शक्‍य झाले ते उत्पादक शेतकरी तुकाराम रोंगे यांनी सांगितले. 

विकणारा माल पिकवणे बरे 
पिकलेले विकण्यापेक्षा विकणारा माल पिकवलेला बरा ही भूमिका ठेवून शेती उत्पादनातील नवनवीन प्रयोग अंगी कारल्यामुळे पीक पद्धतीत बदल केल्यामुळे चांगले उत्पन्न मिळू लागले त्यामुळे दररोज पैसे मिळणारे पीक आपल्याला फायदेशीर ठरू लागले आहेत. 
- तुकाराम रोंगे शेतकरी,भाळवणी 


संपादन ः प्रकाश सनपूरकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT