crime news   sakal
सोलापूर

सोलापूर : पंढरपुरात चार तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

रुळाजवळ दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू प्यायलेले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pandharpur Train Accident : पंढरपूरमध्ये रेल्वेने दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर एक जणम गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत जखमी आणि मृत्युमुखी पडलेले तरूण मुळचे बिहारचे असून ते मजुरी काम करत असल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात चार मजूर रुळावरुन जात होते त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱया एखाद्या रेल्वेने या सर्वांना उडवले असल्याचे संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एका मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. अद्यपपर्यंत घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळक पटलेली नसून त्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, रुळाजवळ दारुच्या बाटल्यादेखील सापडल्या आहेत. त्यामुळे हे मजूर दारू प्यायलेले असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT