Three persons were killed on the spot when their two wheelers collided head-on on Karad Pandharpur road 
सोलापूर

कराड-पंढरपूर रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक; तिघेजण जागीच ठार तर दोघांची प्रकृती चिंताजनक

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : कराड-पंढरपूर रस्त्यावरील चिकमहूद (ता.सांगोला) हद्दीतील बंडगरवाडी पाटीजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर ट्रॅक्टर दुचाकीवरुन गेल्याने झालेल्या अपघातात पंढरपूर तालुक्यातील आजोबा-नातू सह सातारा जिल्ह्यातील एक वयस्कर महिला असे तिघेजण ठार झाले आहेत. तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील भगवान रामचंद्र पडवळकर (वय ७०) हे आपला नातू अक्षय बंडू पडवळकर (वय २०) याचे सोबत एम.एच.१३ डी.सी.०३९७ या दुचाकी वरून पौर्णिमेनिमित्त खरसुंडी (ता.आटपाडी,जि.सांगली) येथे देवदर्शनासाठी निघाले होते. तर देवापूर (ता.माण,जि.सातारा) येथील अरुण भगवान कांबळे (वय ५०), रोहित अरुण कांबळे (वय १७) व मुक्ताबाई भगवान कांबळे (वय ७५) हे तिघे एम.एच.४२, एस. ५८१० या दुचाकीवरून सांगोला तालुक्यातील महीम येथे कावीळ या आजारावरील आयुर्वेदिक औषध उपचार घेण्याकरीता निघाले होते.

ही दोन्ही दुचाकी वाहने चिकमहूद हद्दीतील बंडगरवाडी पाटीजवळ आली असताना त्यांची समोरासमोर धडक झाली व पंढरपूरच्या दिशेने चाललेला ट्रॅक्टरचे चाकही कांबळे यांच्या दुचाकीवरून गेले. यामुळे ही दुचाकी अक्षरशः दुमती झाली आहे. तर दोन्ही दुचाकी एकमेकापासून दूरवर जाऊन पडल्या होत्या. मुक्ताबाई भगवान कांबळे या रस्त्याच्या मधोमध फेकल्या गेल्या तर इतर चौघेजण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. एकाच वेळी पाच जण रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

दोन्ही दुचाकीवरील पाच जणांना जोरदार मार लागल्याने सर्वत्र रक्त सांडलेले दिसत होते. या अपघातात कासेगाव (ता. पंढरपूर) येथील भगवान रामचंद्र पडवळकर (वय७०) व त्यांचा नातू अक्षय बंडू पडवळकर (वय २०) याचा मृत्यू झाला. तसेच सातारा जिल्ह्यातील देवापूर (ता. माण) येथील मुक्ताबाई भगवान कांबळे (वय ७५) यांचाही मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असणारे अरुण भगवान कांबळे (वय ५०) व रोहित अरुण कांबळे (वय१७) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ १०८ क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावली व जखमींना ताबडतोब पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद सांगोला पोलिसात झालेली नाही. पंढरपूर ते दिघंची हा रस्ता नव्याने तयार करण्यात आला असल्याने  वाहने अतिशय वेगाने जात आहेत. शिवाय काही ठिकाणी अतिशय धोकादायक वळणे असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT