student photo 
सोलापूर

तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मिळेना बक्षिस 

प्रमोद बोडके

सोलापूर : सरकारी काम आणि सहा महिने थांब. अशी आजपर्यंतची म्हण रूढ होती. या म्हणीला खुजे ठरवत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाने नवी कामगिरी केली आहे. सरकारी काम आणि तीन वर्षे थांब...अशीच काहीशी स्थिती या विभागांनी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती आपत्ती निवारण दिनानिमित्त ऑक्‍टोबर 2017 मध्ये झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्यापही झालेले नाही. या दोन विभागात व्यवस्थापन नसल्याने स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या बक्षीसावरच आपत्ती आली आहे. 
हेही वाचा - गुड न्यूज! मदरशांना ठाकरे सरकारकडून दीड कोटी 
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत 13 ऑक्‍टोबर 2017 रोजी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा झाल्या. माध्यमिकचे तत्कालीन शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी याबाबतची तसेच सूचनाही सर्वांना केली होती. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपयांचे प्रथम, तीन हजारांचे द्वितीय व दोन हजार रुपयांचे तृतीय बक्षीस व प्रमाणपत्र देण्याची घोषणा झाली. 
हेही वाचा - मुस्लिम महिलांनी केला शिवरायांचा जयजयकार 
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, स्पर्धेचा निकालही जाहीर झाला परंतु या विद्यार्थ्यांना बक्षिसाची रक्कम आणि प्रमाणपत्र मात्र अद्यापही मिळालेले नाही. याबाबत आपत्तीव्यवस्थापन विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे बोट दाखविले आहे. माध्यमिक शिक्षण विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे बोट दाखवत आहे. या दोन विभागातील सावळ्या गोंधळामुळे स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी अद्यापही बक्षिसाची रक्कम व प्रमाणपत्रापासून वंचित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT