2lockdown_67.jpg 
सोलापूर

सोलापूर लॉकडाउनच्या उंबरठ्यावर ! आज शहरात 154 तर ग्रामीणमध्ये 217 कोरोना पॉझिटिव्ह अन्‌ सहाजणांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या वाढू लागली असून मृत्यूदर वाढत असल्याची चिंता प्रशासनाला सतावू लागली आहे. शहरात आज एक हजार 237 संशयितांमध्ये 154 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून चौघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामध्ये विजयपूर रोडवरील माशाळ वस्ती येथील 65 वर्षीय पुरुष, देशमुख-पाटील वस्ती परिसरातील 71 वर्षीय महिला, शाहीर वस्ती परिसरातील 72 वर्षीय पुरुष आणि याच भागातील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज शहर-जिल्ह्यात 373 रुग्ण आढळले असून सहाजणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास आगामी काळात कठोर निर्णय घेतला जावू शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

ठळक बाबी... 

  • शहरात एक लाख 94 हजार 837 संशयितांमध्ये आतापर्यंत 13 हजार 950 व्यक्‍ती कोरोना बाधित
  • आज 64 वर्षांवरील चौघांचा मृत्यू; कोरोना बळींची संख्या आता 689 झाली
  • एकूण रुग्णांपैकी 12 हजार 34 रुग्णांची कोरोनावर मात; एक हजार 227 रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • रुग्णवाढ शंभरावर, तरीही होम व इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये अवघे 441 संशयित
  • बरे होणाऱ्यांच्या तुलनेत रुग्णांची वाढ मोठी; नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे महापालिका प्रशासनाचे आवाहन
  • पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींनी स्वत:हून करावी कोरोना टेस्ट; घराबाहेर फिरला आणि पुन्हा पॉझिटिव्ह निघाल्यास होणार पोलिसांची कारवाई

शहरात आज गणेश हौसिंग सोसायटी, भगवती टॉवर, सहस्त्रार्जून नगर, भिमा नगर (जुळे सोलापूर), देशमुख-पाटील वस्ती (देगाव), सहवास सोसायटी (खमितकर अपार्टमेंटजवळ), व्हीएमजीएमसी महिला वसतीगृह, रेसिडेन्सी क्‍वॉर्टर, सुनिल नगर (कामगार वसाहत, एमआयडीसी), सुंदरम नगर, जीएसटी कार्यालयाजवळ (होटगी रोड), आनंद नगर भाग-तीन (नई जिंदगी), गणपती मंदिराजवळ (मोदीखाना), रामवाडी, उत्कर्ष नगर, स्वागत नगर, सैफूल, माशाळ वस्ती, मंत्री चंडक, आदित्य नगर, शिमला नगर, झोपडपट्टी न-एक (विजयपूर रोड), रोहन रेसिडेन्सी (रुबी नगर), राहूल नगर (हत्तुरे वस्ती), बसवेश्‍वर नगर (भवानी पेठ), सुभाष झोपडपट्टी (अशोक चौक), न्यू पाच्छा पेठ, आदर्श नगर, संगम आयकॉन (बिलाल नगर), दक्षिण कसबा, संजय नगर (कुमठा नाका), मुळे हॉस्पिटल क्वॉर्टरस्‌, उत्तर सदर बझार, द्वारका पॅरेडाईज बालाजी हौसिंग सोसायटी (होटगी रोड), वाडिया हॉस्पिटलजवळ (रेल्वे लाईन), यतिमखान्याजवळ (गरिबी हटाव झोपडपट्टी), गंगाधर हौसिंग सोसायटी, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), विद्या नगर कॉलनी (सिव्हिल हॉस्पिटलमागे), प्रभाकर महाराज मंदिराजवळ (सम्राट चौक), राधाकृष्ण कॉलनी, उत्तर कसबा, युनायटेड विहार, अभिषेक नगर (मुरारजी पेठ), डफरीन चौकाजवळ (रेल्वे लाईन), दत्त नगर (मार्कंडेय हॉस्पिटलजवळ), प्रतिक नगर (कुमठा नाका), लक्ष्मी पेठ (दमाणी नगर), अभिमानश्री नगर, मुरारजी पेठ, सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, हनुमान नगर (भवानी पेठ), वसुंधरा अपार्टमेंट (दमाणी शाळेजवळ), वर्धमान नगर, नामदेव सोसायटी (बाळे), वसंत विहार, मंत्री चंडक पार्क, दमाणी नगर, रोटे कॉम्प्लेक्‍स, मोदी (रेल्वे लाईन), उजनी कॉलनी, शिंगी कॉम्प्लेक्‍स, वसंत नगर (पोलिस लाईन), कांचन अपार्टमेंट (गांधी नगर), वसंत विहार (जुना पुना नाका), जगजीवनराम झोपडपट्टी, आसरा इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, सिध्देश्‍वर नगर (एमआयडीसी), कामाक्षी नगर (बिराजदार शाळेजवळ), मंजुनाथ नगर, महालक्ष्मी नगर (साई होम्सजवळ), नेहरू नगर, गणेश नगर, सुशिल नगर, थोबडे वस्ती, निर्मिती विहार, लिमयेवाडी, जुना विडी घरकूल, रविवार पेठ, घोंगडे वस्ती, आशा नगर, निलम नगर, विनायक नगर, सुत मिलजवळ, राजस्व नगर, आसरा पुलाजवळ, शिवशरण नगर, सिध्देश्‍वर पेठ, लष्कर, गौरीशंकर अपार्टमेंट (रामलाल चौक), गायत्री नगर (वसंत विहार), शेळगी, महावीर चौक, रंगराज नगर (विडी घरकूल), भगवान नगर, वानकर वस्ती, आदर्श नगर याठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT