Vehicle pushers 
सोलापूर

जोर लगा के हईऽऽशा..! पेट्रोलपंप बंद; आली गाड्या ढकलत नेण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना वगळून इतर सर्व दुकाने मंगळवारी बंद होती. शहरातील पेट्रोल पंपही सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते. मात्र याबाबत बहुतेक नागरिकांना माहिती नसल्याने दुपारी दोननंतर मात्र अनेक दुचाकीस्वारांना दुचाकी ढकलत नेण्याची वेळ आली.

नागरिकांना नाही "कोरोना'चे गांभीर्य
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार जमावबंदी लागू करण्यात आली होती. जीवनावश्‍यक वस्तू वगळून सर्व आस्थापने शनिवारी बंद होती. रविवारी मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी शहरात जमावबंदी असतानाही नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. राज्यातही अशीच स्थिती दिसून आली. नागरिकांना कोरोना विषाणूचे गांभीर्यच लक्षात येत नाही, हे समोर आल्याने राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी व जिल्ह्यांमध्ये नाकाबंदीचे आदेश दिले आहेत.

पेट्रोलपंप बंदबाबत नव्हती अनेकांना माहिती
संचारबंदीच्या कालावधीत मंगळवारी दिवसभर जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने
सुरू होती. मात्र पेट्रोल पंपाचे वेळापत्रक शासनाने जाहीर केले ते बहुसंख्य नागरिकांना माहितीच नव्हते. मंगळवारी सकाळी शहरातील पेट्रोल पंप सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी झाली होती. दुपारी दोननंतर पेट्रोलपंप बंद झाले. ज्यांना पेट्रोल पंपाच्या वेळापत्रकाची माहिती नव्हती, ते वाहनधारक पेट्रोल पंपांपर्यंत वाहन ढकलत आणत होते व पेट्रोलपंप बंद असल्याचे पाहून मोबाईलवरून शहरात कुठे पेट्रोलपंप सुरू आहेत का, याची विचारपूस करत होते. मंगळवारच्या दुपारी भर उन्हात घामाच्या धारांमध्ये वाहनधारकांना वाहन ढकलत चालू असलेल्या पेट्रोल पंपांचा शोध घेत फिरावे लागले.

महत्त्वाच्या कामासाठी आम्ही दुपारी मोटारसायकल घेऊन घराबाहेर पडलो. गाडीत पेट्रोल कमी होते. अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर अडीच वाजता पेट्रोलसाठी गेलो तर पंप बंद होता. त्यामुळे गाडी ढकलत घरी जावे लागत आहे.
- राहुल काळे

सोमवारी रात्री 11 वाजता आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आल्या, की मंगळवारपासून 31 मार्चपर्यंत पेट्रोलपंप सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवावा. त्यानुसार आम्ही पेट्रोल पंपावर तशी सूचनाफलक लावली आहे.
- आनंद सादूल, पेट्रोल पंपचालक, अक्कलकोट रोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT