corona-positive-1585803595.jpg 
सोलापूर

ग्रामीणने ओलांडला दहा हजाराचा टप्पा! आज 221 पॉझिटिव्ह अन्‌ दहा जणांचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असतानाच ग्रामीण भाग कोरोनापासून चार हात लांबच होता. मात्र, आता शहरातील रुग्णंसख्या कमी होऊ लागली असतानाच ग्रामीण भागात विषाणूचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. आज 211 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून तब्बल दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

  • जिल्ह्यातील 76 हजार 546 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत 11 तालुक्‍यांमध्ये आढळले 10 हजार 248 पॉझिटिव्ह 
  • आज एक हजार 283 अहवालातून 221 झाले पॉझिटिव्ह; 158 रिपोर्ट प्रलंबित 
  • पाच पुरुष अन्‌ पाच महिलांचा कोरोनाने आज घेतला बळी 
  • ग्रामीण भागातील मृतांची संख्या झाली 293; सात हजार 77 रुग्णांची कोरोनावर मात 

अक्‍कलकोट तालुक्‍यातील किणीवाडी, माणिक पेठ, स्टेशन रोड, वागदरी, बार्शीतील आगळगाव रोड, अलिपूर रोड, जैन मंदिरामागे, गाडेगाव रोड, घोळवेवाडी, गुळपोळी, कासारवाडी, मंगळवार पेठ, नागणे प्लॉट, नवी चाटे गल्ली, रुई, सनगर गल्ली, सौंदरे, उक्‍कडगाव, उपळाई रोड, वैराग येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर करमाळ्यातील चांदगुडे गल्ली, जिंती, कमलाई नगर, कानड गल्ली, कंदर, माढ्यातील आढेगाव, अरण, कुर्डूवाडी, म्हैसगाव, मिटकळवाडी, मोडनिंब, रांझणी, सुर्ली, तांबवे, टेंभूर्णी, तुळशी, मंगळवेढ्यातील हिवरगाव, तर मोहोळ तालुक्‍यातील आढेगाव, अष्टी, कळसे नगर, मोहोळ स्टेशन, येवती येथेही नव्या रुग्णांची भर पडली आहे. उत्तर सोलापुरातील बीबी दारफळ, कोंडी, नंदूर, पाकणी, पंढरपुरातील अनवली, भक्‍ती मार्ग, भोसले चौक, डोंबे गल्ली, जुनी पेठ, कडबे गल्ली, कैकाडी महाराज मठ, करकंब, केसकरवाडी, लिंक रोड, महापौर चाळ, महावीर नगर, रुक्‍मिणी पटांगण, संभाजी चौक, संत पेठ, सावरकर नगर, सांगोल्यातील धायटी, घेरडी, कोष्टी गल्ली, महूद, नाझरे, दक्षिण सोलापुरातील हत्तूर, होटगी स्टेशन, विडी घरकूल, एनटीपीसी कॉलनी, वांगी, माळशिरसमधील अकलूज, आनंदनगर, चाकोरे, चांदापुरी, दसूर, धर्मपुरी, फोंडशिरस, गिरझनी, कन्हेर, माळीगनर, मिरे, कोर्टजवळ, नेवरे, पठाण वस्ती, संग्रामनगर, शिंदेवाडी, श्रीपूर आणि शिक्षक कॉलनी येथे आज नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

'येथील' दहा जणांचा मृत्यू
कुसुर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 50 वर्षीय महिला, हरिदास वेस, गजानन नगर येथील 60 वर्षांवरील दोघांचा, कोरवलीतील (ता. मोहोळ) 40 वर्षीय महिला, पुनमिया प्लॉट, नाळे प्लॉट येथील 65 वर्षांवरील दोघांचा, तांबवे, टेंभूर्णी येथील 75 वर्षांवरील दोघांचा आणि बागेचेवाडी, संग्राम नगरातील 65 वर्षांवरील दोघांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान - युएई सामना होणार? आता PCB ने केली मोठी विनंती; खेळाडू स्टेडियमकडे रवाना

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar News : आमदार विलास भुमरे प्रभारी जिल्हाप्रमुख; पैठण, फुलंब्री, सिल्लोड मतदारसंघांची दिली जबाबदारी

Kedarkheda Accident : देऊळगाव ताड येथील नामदेव गाडेकर यांचा बसच्या धडकेने मुत्यु

Latest Marathi News Updates : चांदणी नदीच्या पुरात वाहणाऱ्या व्यक्तीला तरुणांनी जीवाची बाजी मारत वाचवले

SCROLL FOR NEXT