सोलापूर

आज धावताहेत 34 श्रमिक एक्‍सप्रेस 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक हजार 236 मजुरांना घेऊन कुर्डूवाडीहून लखनऊला श्रमिक एक्‍स्प्रेस रवाना झाली आहे. तर राज्यभरातून आज गुरुवारी (ता. 14) 34 रेल्वेगाड्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी धावत आहेत. 

पुणे ते रेवा (दुपारी 12 वाजता निघाली), सीएसएमटी ते गोंडा (दुपारी एक वाजता निघाली), कोल्हापूर ते प्रयाग (दुपारी एक वाजता निघाली), कुर्डूवाडी ते लखनऊ (दुपारी 2 वाजता निघाली), सीएसएमटी ते बांदा (दुपारी 2 वाजता निघाली), सीएसएमटी ते गोंडा (दुपारी 2 वाजता निघाली), एलटीटी ते जौनपूर (दुपारी 2 वाजता निघाली), एलटीटी ते बस्ती (दुपारी अडीच वाजता निघाली), एलटीटी ते वाराणसी (दुपारी 3 वाजता रवाना), नागपूर ते उधमपुर (दुपारी 3 वाजता रवाना), सीएसएमटी ते कलबुर्गी (दुपारी 3 वाजता निघाली), पनवेल ते दालतोगंज (दुपारी 3 वाजता निघाली), एलटीटी ते लखनऊ (दुपारी 4 वाजता निघाली), पुणे ते रेवा (दुपारी 4 वाजता निघाली), पनवेल ते लखनऊ (वाराणसी) (सायंकाळी 5 वाजता निघेल), सीएसएमटी ते लखनऊ (सायंकाळी 6 वाजता निघेल), कोल्हापूर ते प्रयाग (रात्री 7 वाजता निघेल), पुणे ते रेवा (रात्री 8 वाजता निघेल), मिरज ते रेवा (रात्री 8 वाजता निघेल), सीएसएमटी ते कटिहार (रात्री 8 वाजता निघेल), एलटीटी ते लखनऊ (रात्री 10 वाजता निघेल), मुंबई ते मुजफ्फरपुर (रात्री 10 वाजता निघेल), ठाणे ते मधुबनी (रात्री 11 वाजता निघेल), पुणे ते बरौनी (रात्री 11 वाजता निघेल), सातारा ते बस्ती (वेळ निश्‍चीत नाही), बांद्रा ते गोंडा (दुपारी 12 वाजता निघाली), बोरवली ते गोरखपूर (दुपारी 12 वाजता निघाली), वसई ते जौनपूर (दुपारी 2 वाजता निघाली), बांद्रा ते गोरखपूर (दुपारी 3 वाजता निघाली), बोरवली ते प्रतापगड (दुपारी 3 वाजता निघाली), बांद्रा ते गोरखपूर (सायंकाळी 6 वाजता निघेल), बोरवली ते गोंडा (सायंकाळी 6 वाजता निघेल), वसई ते सिंकर (रात्री 7 वाजता निघेल), बोरवली ते जौनपूर (रात्री 10 वाजता निघेल) अशा रेल्वेगाड्या धावणार आहेत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील परप्रांतीयांची जिल्हानिहाय यादी केंद्रीय रेल्वेमंत्री व केंद्रीय गृह मंत्रालयाला काही दिवसांपूर्वी पाठवली आहे. त्यानूसार आता टप्प्याटप्प्यांमध्ये रेल्वे उपलब्ध होत आहेत. 

रेल्वेत 24 डब्यांत चौदाशे प्रवासी 
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी सोडण्याची परवानगी दिल्यानंतर त्यांच्यासाठी श्रमिक एक्‍सप्रेसची व्यवस्था करण्यात आली. आज (गुरुवारी) दुपारी 2 वाजता कुर्डूवाडीहून एक हजार 236 प्रवाशी घेऊन श्रमिक एक्‍सप्रेस लखनऊला रवाना झाली आहे. कुर्डूवाडीहून निघालेली ही रेल्वे थेट मनमाड येथे काही वेळ थांबेल. त्यानंतर ती लखनऊला पोहोचेल आणि तेथील राज्य सरकार त्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या मूळगावी सोडण्याची व्यवस्था करेल. श्रमिक एक्‍सप्रेसशिवाय अन्य प्रवासी रेल्वेगाड्या 30 जूनपर्यंत धावणार नाहीत. 
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT