Today is Ramadan Eid 
सोलापूर

चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी रमजान ईद

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर ः चंद्रदर्शन आज झाल्याने रमजानचे तीस रोजे (उपवास) पूर्ण झाले असून उद्या (सोमवारी) रमजान ईद साजरी होणार असल्याचे येथील रुपते हिलाल कमिटीचे (चॉंद कमिटी) शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी यांनी ही माहिती दिली.


काझी म्हणाले, चंद्रदर्शन झाल्याने उद्या सर्व मुस्लीम बांधवांनी रमजान ईदची नमाज घरातच अदा करावी. सध्या 31 मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे तसेच पुलिस प्रशासनाने दिलेली सूचनानुसार या वर्षी ईदगाहमध्ये ईदची नमाज होणार नाही. त्याबदल्यात आपापल्या घरात चार रकात चाश्‍तची नफिल नमाज किंवा दोन रकात शुकराना नमाज अदा करावे, असे आवाहन काझी यांनी केले.

ईदच्या दिवशी एकमेकांना हस्तांदोलन किंवा गळाभेट न करता सोशल डिस्टेन्सचे पालन करून ईदच्या शुभेच्छा द्याव्यात. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सर्वांनी रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करावी व गरजूंना मदत करावी, असे आवाहन शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी यांनी केले. 

ईद घरीच साजरी करावी 
कोवीड-19 महामारीमुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला आहे. यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी करण्यात आली आहे. अशा पररस्थितीत रमजान ईदची नमाज इदगाहमध्ये अदा केली जाणार नाही. ईद अत्यंत साध्यापणाने घरातच साजरी करावी. लोकांनी बाहेर न पडता घरातच ईद साजरी करावी, असे आवाहन काझींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT