Sawata Mali 
सोलापूर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही पांडुरंग व संत सावता माळी भेटीची परंपरा अखंडित; "या' मंत्र्यांनी केले प्रयत्न 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा व पंढरपूरची आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने पांडुरंग आणि संत सावता माळी भेटीविषयी भाविकांमध्ये साशंकता होती. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पांडुरंग आणि संत सावता माळी भेटीची परंपरा कायम राखली गेली असल्याची कृतज्ञता संत सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी व्यक्त केली. 

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रत्येक वर्षी पंढरपूरहून पांडुरंगाची पालखी अरणला नेली जाते. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षी कोरोनामुळे संत सावता माळी आणि पांडुरंग भेटीची परंपरा खंडित होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, ही परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घातले होते. त्यांनीही तत्काळ याविषयी विठ्ठल मंदिर समिती आणि विभागीय आयुक्तांशी चर्चा करून परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. त्यांनी सूचना दिल्यामुळे पांडुरंग आणि संत सावता माळी भेटीची परंपरा कायम राहिली आहे. 

श्री. आखाडे म्हणाले, पंढरपूरहून पांडुरंगाची पालखी अरणला येण्याची परंपरा फार मोठी आहे. ही परंपरा कायम राहावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याविषयी पाठपुरावा केला. अजित पवार यांनीही या परंपरेची दखल घेऊन लक्ष घातले. त्यांच्या पुढाकारामुळेच श्री विठ्ठलाच्या पादुका पंढरपूरहून अरणला आणण्यात आल्या होत्या. पांडुरंग परमात्मा व संत सावता महाराज यांच्या भेटीची परंपरा अखंड राहिली गेली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis New Rule Taxi : प्रताप सरनाईकांच्या निर्णयाला देवेंद्र फडणवीसांची केराची टोपली; रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ

IND vs SL, 2nd Test : मोहम्मद सिराजला कोलंबो कसोटीत दुखापत होती का? अखेर कर्णधार शुभमन गिलनेच केला खुलासा

Gold Rate Today: रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं झालं स्वस्त! बहिणीसाठी दागिना घेण्याची सुवर्णसंधी? पाहा आजचा ताजा भाव

Marathi News Live Updates : गोकुळ निवडणुकीची मोठी अपडेट : कच्च्या मतदार यादीवरील उर्वरित ३१० हरकतींवर आज अंतिम सुनावणी; ३१ ऑगस्टला निकाल!

Amravati Hospital: बेड नाहीत म्हणून जमिनीवर उपचार! अमरावतीच्या इर्विन रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर..

SCROLL FOR NEXT