asara chowk.jpg 
सोलापूर

आसरा चौकाजवळील पुलावरील वाहतूकीचा भार बनला त्रासदायक 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जुळे सोलापूर भागातील अरुंद असलेल्या रेल्वे पुलावरील नागरी वाहतुकीसोबत व विजापूर, हैद्राबादकडे जाणारी माल वाहतूक वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या वाहतुकीने परिसरातील नागरिकांना धडकी भरली आहे. जुळे सोलापूरमधील वाढती लोकसंख्या, नागरिकांच्या वर्दळीला हा रस्ता व पुल अपुरा पडू लागला आहे. त्यातच आंतरराज्य रस्त्याच्या वाहतुकीचा भार वाढल्याने ट्रॅफिक जाम व छोटेमोठे अपघाताला निमंत्रण मिळू लागले आहे. 

अनेक यंत्रणाचा हा रस्ता व पुलाशी असलेला संबंध पाहता जुळे सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न एैरणीवर आला आहे. जुळे सोलापूरमधील आसरा चौकाला जोडणारा हा रेल्वे पूल आहे. 

या पुलाला दोन्ही बाजूने महत्वाचे रस्ते जोडलेले आहेत. मागील काही वर्षात जुले सोलापूरची लोकसंख्या व वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, मॉल, भाजीमंडी या सारख्या अनेक गोष्टीसाठी नागरिक व विद्यार्थ्यांना हाच एक महत्वाचा रस्ता आहे. जुळे सोलापूरची लोकसंख्या लाखोच्या घरात चालली आहे. पुर्वी या भागात असलेल्या बोटावर मोजण्याइतक्‍या वसाहती आता शेकडोमध्ये वाढल्या आहेत. परिसरातील वसाहतींचे अंतर्गत या मुख्य रस्त्याला येऊन मिळतात. आसरा चौकातून पुढे शहरातील इतर भागाकडे जुळे सोलापूर जोडले जाते. हा पुल रेल्वे खात्याने बांधलेला आहे. रेल्वे केवळ रेल्वेवाहतूकीचा विचार करून पुलाला महत्व देते. पुलाच्या वर सुरू असलली वाहतूकीचा रेल्वेशी संबंध येत नाही. मात्र रस्ता हा दुपदरी असला तरी अरुंद पुलामुळे नेमके पुलावर ट्रॅपिक जाम होते. बांधकाम विभागाचा देखील होटगी रोडपर्यंत संबंध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT