auto.jpg 
सोलापूर

रिक्षाचालकांची बेशिस्त नियंत्रणात आली तरच वाहतुकीला लागेल शिस्त 

अरविंद मोटे

सोलापूर: भर रस्त्यांवर हवी तिथे रिक्षा उभी करणे, थांबा नसलेल्या ठिकाणी एकापेक्षा अधिक रिक्षा नंबर लावून थांबणे. मनाला वाटेल तेथून रिक्षा वळवणे, हे चित्र आहे सोलापूर शहरातील अंतर्गत वाहतुकीचे. सध्या शहरात बेशिस्त रिक्षाचालकांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. सध्या शहरातील मंगळवार बाजार, बेगमपेठ, जिल्हा सत्र न्यायालय, जेलरोड परिसरात मोठ्या संख्येने थांबा नसलेल्या जागी रिक्षा थांबावून उभे असतात. याचा फटका शहरातील वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. 


कोरोनाच्या काळात अनेक दिवस रिक्षावाहतूक बंद होती. सध्या कमी क्षमतेने रिक्षामधून प्रवाशी वाहतूक सुरू आहे. गेल्या अनेक दिवस बंद असलेल्या रिक्षा व्यवसाय नुकताच सुरळीत होत आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये चढाओढ होत असून थांबा नसलेल्या जागीही रिक्षा थांबवल्या जातात. नको त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या रिक्षामुळे इतर वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना शिस्तेचे धडे द्यावेत. योग्य ठिकाणीच रिक्षा उभी केल्यास प्रवाशांच्याही सोयीचे होणार आहे. 
शहरात नविन ऍटो थांबे शोधून त्याची जागा निश्‍चित केली पाहीजे. तसेच प्रत्यक्षात ऍटो चालकांची गरज काय आहे याबाबत त्यांच्याशी संवाद साधून अनेक प्रश्‍न सुटू शकतात. काही ठिकाणी थांबे आहेत पण त्याची नोंद केलेली नाही. पण त्याचा नागरिकांना ऍटो मिळवण्यासाठी चांगला उपयोग होतो. नव्या वसाहतीमध्ये थांब्याचे सर्वेक्षण व्हावे. ऍटोचालकांनी देखील त्यासाठी प्रशासनास मदत करणे अपेक्षित आहे. 

रिक्षा स्टॉपवर फलक हवेत 
रिक्षा चालकांसाठी ठराविक जागी रिक्षा स्टॉप नेमण्यात यावेत. सबंधीत ठिकाणच्या जागेतनुसार रिक्षा थांबा किती रिक्षा करिता आहे याचा फलक रिक्षा स्टॉपवर लावण्यात यावा तसेच रस्त्यावर मार्किंग करण्यात येणे आवश्‍यक आहे. अतिरीक्त रिक्षा उभ्या केल्यास दंड आकारणी केली तरच रिक्षाचालकांना शिस्त लागेल अन्यथा वाहतूक कोंडी अटळ आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT