The truck driver was robbed on Saturday near Modenimb 
सोलापूर

मोडनिंबजवळ गळ्याला कोयता लावून ट्रकचालकाला लुटले; अंजनगावातील दोघांसह सात जणांवर गुन्हा

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : ट्रकच्या समोरील बाजूची काच दगड मारून फोडून तीन मोटरसायकलवरून आलेल्या नऊ जणांपैकी दोघेजण ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रकमालकाच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील 1 लाख 19 हजार रूपयांची रक्कम जबरदस्तीने घेऊन गेले. ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ घडली.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
या प्रकरणी माढा तालुक्‍यातील अंजनगांव (खेलोबा) येथील दोघे व सात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. ट्रकमालक रविंद्र दत्तू परबत (वय 48, रा. चाळीस फुटी रोड, इंदापूर) यांनी सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी (रा. अंजनगांव खेलोबा, ता. माढा) व सात अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ट्रकमालक रविंद्र परबत व ट्रकचालक हैदर अमिन पठाण हे दोघे गुरूवार (ता. 11) रोजी ट्रक (एम. एच. 12/ क्‍यू. जी. 7174) घेऊन तेलंगणा राज्यातील तांडूर येथे सिमेंट आणण्यासाठी गेले होते. तांडूर येथे ट्रकचे टायर स्वस्त मिळत असल्याने जाताना इंदापूर येथील युनियन बॅंकेतून एक लाख व स्वतःकडील दहा हजार असे एकूण एक लाख दहा हजार रुपये घेऊन गेले होते. त्यापैकी दोन हजार रूपये खर्च झाले.

शुक्रवारी सकाळी दहा वाजता तांडूर येथून सिमेंट भरून गाडी भाड्याचे बारा हजार रुपये ऍडव्हॉन्स घेऊन परत निघाले. कर्नाटक राज्यातील सेडम येथे टायरची चौकशी केली असता जास्त किंमत सांगितल्याने टायर घेतले नाहीत. नंतर शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोडनिंब येथील उड्डाण पुलानजीक ट्रक आली असता तीन मोटरसायकलवरून नऊजण आले. ते ट्रक थांबव थांबव असे म्हणत होते. पण ट्रक न थांबविता पुढे घेऊन गेले. नंतर त्यांनी मोटारसायकलवरून पुढे येऊन काचेवर दगड मारला. त्यामुळे काच फुटल्यावर ट्रक बाजूला घेऊन थांबविला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोपट काशिद हे करीत आहेत. 

मोडनिंबच्या दिशेने चोरटे रवाना 

तोंडाला रूमाल बांधलेले दोघेजण क्‍लिनरच्या बाजूने ट्रकमध्ये चढले. त्यांनी ट्रकमालकाच्या गळ्याला कोयता लावला व जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील एक लाख 19 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दोघेजण ट्रकमधून खाली उतरले. त्यांनी तोंडाला बांधलेला रूमाल काढला, तेव्हा सागर सुनिल मसूरकर व सौरभ माळी या दोघांना ट्रकमालकाने ओळखले. इतर सात जणांनी तोंडाला रूमाल बांधून ट्रकच्या खाली थांबले होते. नंतर ते सर्वजण मोडनिंबच्या दिशेने निघून गेल्याचे रविंद्र परबत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT