वडाळा(सोलापूर)ः कोरोनाचे सोलापूर शहरातील लोण आता उत्तर सोलापूर तालुक्यात पसरु लागले आहे. उत्तर तालुका आरोग्य यंत्रणा आता रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट द्वारे किमान एक हजार तर कमाल बाराशे जणांची चाचणी करणार आहे.
ता. 16 ते ता. 18 या कालावधीत कोरोना रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट माध्यमातून 522 जणांचे चाचणी घेतली असून यामध्ये 37 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क नागरिक, 60 वयापुढील आजारी असणारे जेष्ठ नागरिक, आशा वर्कर, रेशन दुकानदार, किराणा दुकानदार, स्थानिक सक्रीय कर्मचारी व जे नागरिक बाहेर कामधंद्यामुळे इतरांच्या संपर्कात येत असणारे अशा नागरिकांच्या चाचण्या उत्तर सोलापूर तालुक्यात मोहीम हाती घेतली आहे.
सध्या उत्तर तालुक्यात मार्डी, कारंबा, भोगांव, बाणेगांव, तळेहिप्परगा, पाकणी, कोंडी, तिर्हे, बीबीदारफळ, कौठाळी, नान्नज या गावांत कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे उत्तर सोलापूर तालुका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यासाठी खास प्रशिक्षण दिलेले तीन तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार केले आहे. त्यांना सहाय्यक म्हणून तीन प्रशिक्षित डॉक्टर असणार आहेत. यामुळे तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. यासाठी नागरिकांनी घाबरुन न जाता इतरांच्या संपर्कात न येता सुरक्षित अंतर ठेऊन मास्क व सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने करावा. प्रशासनाने आजाराच्या बाबत जारी केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसिलदार जयवंत माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे. उत्तर तालुक्यात कोरोना रुग्णांवर सिंहगड शिक्षण संकुल येथील कोविड केअर सेंटर, शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे उपचार करण्यात येत आहेत.
स्वतःहून चाचणी करणे आवश्यक
जे नागरिक इतरांच्या संपर्कात काही कामानिमित्त येतात अशा नागरिकांनी स्वतःहून चाचणी करण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे पुढे आपल्या कूटुंबात अथवा इतरांपर्यंत जाणारी कोरोनाची साखळी खंडीत होईल. यामुळे कोरोनाचे विरोधातील युद्ध आपण जिंकणार आहोत"
- डॉ. श्रीकांत कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी, उत्तर सोलापूर
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.