pahat ganee.jpeg 
सोलापूर

एकवीस वर्षांनंतर पहाटगाण्यांशिवाय दिवाळी 

अरविंद मोटे

सोलापूर : गेली 21 वर्षे दिवाळीचा पहिला दिवस उजाडयचा तो रम्य पहाटगाण्यांनी. सोलापुरात पहाट गाण्यांची परंपरा 1999 साली गिरीश पंचवाडकर यांनी सुरू केली. या स्वर्गीय सुखाच्या सुखाच्या सोहळ्याची पंरपरा यंदा कोरोनामुळे खंडित झाली. 16 नोव्हेंबरपासून सभागृहे, नाट्यगृहे खुली होणार असल्याचे नोव्हेंबरच्या सुरवातीलाच शासनाचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पहाटगाण्यांशिवाय साजरी झाली. त्यामुळे संगीत रसिकांना यंदा व्हर्चुअल कार्यक्रम व दूरचित्रवाणीवरील मैफलीवरच समाधान मानावे लागले. 

सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ व जाणकार रसिकांचे शहर म्हणून ख्याती असलेल्या सोलापूरात 1999 साली दिवाळीच्या पहाटे क्षितीज प्रस्तुत "पहाटगाणी' हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांना पर्वणीच होता. या पहाटगाणी कार्यक्रमाचा प्रवास व प्रारंभही तितकाच रम्य आहे. 


याबद्दल सांगतान गिरीश पंचवाडकर म्हणाले की, 1999 साली दिवाळीच्या पहाटे चार वाजता भक्ती संगीत व नाट्यसंगीताचा फराळ रसिक श्रोत्यांना मिळावा या तळमळीने क्षितीज संस्थेने या कार्यक्रामची निर्मीती केली. अगदी पहाटेच होणारा हा पाहिलाच कार्यक्रम असल्याने वेळच्या नियमांमुळे हुतात्मा स्मृती मंदिर मिळाले नाही. त्यामुळे पहिला कार्यक्रम सेवा सदन शाळेच्या सभागृहात झाला. पहिल्याच कार्यक्रमाचे उद्‌घाटन कुणा आमदार खासदारकडून न करता पहिल्यांदा येणाऱ्या रसिक श्रोत्याच्या हस्ते करण्याचे ठरवले. त्यावेळी पहाटे चार वाचून पाच मिनिटांनी तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या मंदिरासमोरील एक चहा विक्रेता पहाटेच्या बसने तुळजापूरहून सोलापूरला खास कार्यक्रमासाठी आला होता. वर्तमानपत्रातील जाहिरात वाचजून तो आला होता. त्याच्या हस्ते दीपप्रज्वलाने कार्यक्रामचे उद्‌घाटन झाले. पहिल्या कार्यक्रमाला शंभर श्रोत्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात दोनशे आसन क्षमतेचे सभागृह भरून मैदानावर सहाशे श्रोते होते. इतका उदंड प्रतिसाद पहिल्या कार्यक्रमाला मिळाला त्यांनतर सलग वीस वर्षे हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम होत आहे. 

सोलापूरात पहाटगाण्यांची सुरवात गिरीश पंचवाडकर यांनी केली. मात्र, त्यांनतर निर्मिती एंटरप्रायजेससह अनेकांनी पहाटे संगीत कार्यक्रम घेणे सुरु केले. अनेक बॅंकांचे, संस्थांचे कार्यक्रम पुढे सुरू झाले. अगदी तिकिट लावून कार्यक्रम देखील झाले. श्रोत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पहाटगाण्यांना मिळत असे. 
- गुरु वठारे

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT