two arrested police caught gas cylinder sold black market solapur sakal
सोलापूर

Solapur Crime : काळया बाजारात विक्रीसाठी निघालेला गॅस कामती पोलीसांनी पकडला",मोठा अनर्थ टळला

कामती पोलिसांनी दाखविलेल्या तत्परते मुळे मोठा अनर्थ टळला.

राजकुमार शहा

मोहोळ : कामती पोलिसांनी गॅस कंटेनरमधील गॅस सिलेंडर टाक्यात भरून तो काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा संशयितासह एक कंटेनर, पिकअप व गॅस सिलेंडर टाक्या असा सुमारे 60 लाख 26 हजार 369 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.दरम्यान कंटेनर चालक अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

हा प्रकार मंगळवार ता 11 रोजी मध्यरात्री नंतर सोलापूर- मंगळवेढा महामार्गावरील सोहाळे शिवारातील एका हॉटेलच्या आवारात उघडकीस आला.दरम्यान या घटने तील ताब्यात घेतलेल्या संशयिताना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी दिली.

तुकाराम हणमंत नाईकनवरे, वय 35 रा.सोहाळे, संजय मोहन पाटील वय 36 रा.डोंगरगाव ता.मंगळवेढा व पळून गेलेला कंटेनर चालक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या बाबत कामती पोलीसा कडुन मिळालेली माहिती अशी: सोलापूर- मंगळवेढा महामार्गावरील सोहाळे ता मोहोळ शिवारात मंगळवारी मध्यरात्री नंतर एच पी गॅस लिहिलेला कॅप्सूल आकाराचा एम .एच. 48 /ए .वाय. 4698 या क्रमांकाच्या गॅस भरलेल्या कंटेनरमधून

एम.एच.25/ ए.जे.5186 या क्रमांकाच्या अशोक लेलंड पिकअप मध्ये ठेवलेल्या टाक्यात गॅस भरला जात होता.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,पोलीस नाईक भारत चौधरी,

अमोल नायकोडे,सचिन जाधवर, निशिकांत येळे,हरिदास चौधरी,प्रथमेश खैरे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता सदरचा प्रकार दिसून आला. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक डुणगे यांनी 17 हजार 640 किलो वजनाचा आठ लाख,40 हजार 369 रुपये किमतीचा गॅस,

एक पिकअप वाहन,56 रिकाम्या लोखंडी गॅस टाक्या, गॅस भरलेल्या 18 लोखंडी टाक्या,एक इलेक्ट्रिक वजन काटा,सहा जॉईंट पाईपसह लोखंडी नौजल, अॅडजस्ट पाना असा सुमारे 60 लाख,26 हजार 369 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

सदर गॅस हा स्फोटक , ज्वलनशील पदार्थ असून व संभाव्य धोका माहीत असून ही संबंधितांनी सदरचा गॅस काळ्या बाजारात कंपनीच्या समत्ती शिवाय विक्री करता चोरी करताना मिळून आल्याने संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात.

सदर आरोपींना न्यायालया समोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत. कामती पोलिसांनी दाखविलेल्या तत्परते मुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT