Two killed in accident in Madha taluka 
सोलापूर

जालना जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर जोडप्याचा माढा तालुक्‍यात अपघातात मृत्यू 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : कंटेनरने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील ऊस तोडणी करणाऱ्या मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये रामदास दत्तू गायकवाड (वय 38) व त्याची पत्नी मीरा रामदास गायकवाड (वय 35, रा. दोघेही कैकाडी मोहल्ला जालना, जि. जालना) या ऊस तोडणी कामगार मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. 

रामदास गायकवाड व त्याची पत्नी मीरा हे जालना येथून इंदापूर तालुक्‍यातील गणेशवाडी येथे ऊस तोडणी कामासाठी आले होते. ऊस तोडणीचे काम करून ट्रॅक्‍टर भरून देऊन ते दोघे रविवारी रात्री उशिरा मोटारसायकलवरून (एमएच 20/बीडब्ल्यू 4083) गणेशवाडी येथे मुक्कामासाठी खोप्यावर निघाले होते. भीमानगरनजिक सरदारजी ढाब्यासमोर त्यांची मोटारसायकल आली असता मागून येणाऱ्या कंटेनरने (एमएच12/एलटी 6841) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास गायकवाड हा जागीच ठार झाला तर त्याची पत्नी मीरा ही इंदापूर येथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मयत झाली. 

अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, अपघात पथकाचे सहाय्यक पोलिस फौजदार अभिमान गुटाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले. अपघातातील जखमी महिलेस उपचारासाठी इंदापूरला पाठविले पण उपचार सुरू असताना जखमी मीरा गायकवाड यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सुरेश मधुकर भोसले (वय 30, रा. डोंगरगांव, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT