police cartoon 
सोलापूर

बोकडाची हड्डी भोवली..! नाट्यमय घडामोडींनंतर अखेर "त्या' दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : खुनातील आरोपी असलेल्या कैद्याने आंबे (ता. पंढरपूर) येथे बोकडाच्या जेवणाचा प्लॅन आखला. त्या मोहाने दोघा पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने आंबेला नेले. त्या वेळी जेवणासाठी शंभरावर गावकरी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी "तो' कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आंबे गावासह मंगळवेढा पोलिस दलात खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह कैद्यासमवेत बोकड पार्टीला हजेरी लावल्याप्रकरणी पोलिस ठाण्यातील "त्या' दोन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे उपस्थित होते. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल उदय ढोणे, बजरंग माने यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजारी असल्याचे कारण दाखवून उपचाराचे निमित्त करून पंढरपूर तालुक्‍यातील आंबे येथे नेले. दुसऱ्या दिवशी त्या कैद्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाल्याने कैद्याबरोबर बोकडावर ताव मारणारे अनेकजण होम क्वारंटाईन झाले. परंतु या घटनेने मात्र जिल्हाभर खळबळ उडवली. अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिस ठाण्यास भेट देऊन या संदर्भात दोषी असणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले. तसेच तीन कैदी सब जेलमधून पळून गेले होते, याही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक झेंडे यांनी सांगितले. तालुक्‍यात कोरोनाच्या अटकावासाठी मार्चपासून केलेले प्रयत्न कौतुकास्पद असताना आरोपीचे जेलमधून पलायन, पॉझिटिव्ह कैद्यासमवेत केलेली पार्टी यामुळे पोलिस खात्याचा विचित्र कारभार समोर आला आहे. 

मार्च महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने लॉकडाउन जाहीर केला. अशा परिस्थितीत नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करूनदेखील जनता बेभान झाल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला. अशामध्ये विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी नागरिकांना केलेल्या दंडाची रक्कम जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक ठरली तर पोलिस कोरोना बंदोबस्तात गुंतल्याचे पाहून काही अवैध धंदे करणाऱ्यांनी देखील आपले पाय पसरण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कारवाई करून अवैध धंद्यांवर जरब बसवली. त्यांच्या कामगिरीमुळे अन्य तालुक्‍यांची रुग्णसंख्या पाहता तालुक्‍यात कोरोनाला मोठ्या प्रमाणात अटकाव करण्यात यश मिळाले. यात उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या नियोजनबद्ध कामगिरीचे कौतुक होत असताना अचानक सब जेलमधील 28 आरोपी, दोन सुरक्षा अधिकारी, एक पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली. अशा परिस्थितीत कोरोना कुलूपबंद तुरुंगात गेला कसा? याची चर्चा शहरात सुरू होताच सब जेलमधील तीन कैद्यांनी पलायन केले. त्यातील दोन कैदी परिसरात पकडले तर तिसऱ्या कैद्याला अथक परिश्रमाने जेरबंद करण्यात आले. 

कैदी पळून जाण्याची घटना ताजी असताना पोलिसांनी एका कैद्यास आजाराचा बहाणा करत उपचारास नेण्याचे सांगून थेट बोकड पार्टीला हजेरी लावल्यामुळे बोकड पार्टीत मटणावर ताव मारणाऱ्या इतर नागरिकांमध्ये तो कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. जनतेला कायद्याचे ज्ञान देत शिस्तीचे धडे देणाऱ्या पोलिस खात्याला शिस्तीचे धडे कोण देणार? असा सवाल आता सर्वसामान्यांतून विचारला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT