Two separate cases of illegal lending have been registered against six persons at Karkamb police station in Pandharpur taluka 
सोलापूर

करकंबमध्ये सहा जणांविरुद्ध अवैध सावकारकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

सूर्यकांत बनकर, करकंब

करकंब (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध अवैध सावकारकीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.
 
यातील एक गुन्हा हा पंढरपूर येथील सहायक निबंधक सहकारी संस्थेचे सहकारी अधिकारी (श्रेणी 1) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला आहे. त्यांनी उंबरे (पागे, ता.पंढरपूर) येथील गोरख शामराव भोसले व शामराव सोपान भोसले हे दोघेजण सावकारकीचे अनुज्ञाप्तीशिवाय सावकारकीचा व्यवसाय करत असून त्यांनी २४ जणांशी अवैध व्यवहार करुन व्याज वसूल केल्याचे तपासात निष्पण्ण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसरी तक्रार परवीन दस्तगीर मुलाणी (वय 31) यांनी दिली आहे. 

त्यानुसार त्यांनी सचिन पोपट हेगडकर, संतोष रामचंद्र धोत्रे, श्रीकृष्ण भारत जाधव, अमिन रतिलाल पठाण (सर्वजण रा.करकंब) यांच्यविरोधात  दिली आहे. त्यानुसार बचत गट, रत्नाकर बॅंक, वाया फायनान्स सिद्धनाथ ज्वेलर्स व मोडनिंबकर ज्वेलर्समध्ये सोने गहाण ठेवून व स्वतःजवळील काही रक्कम मिळून सर्व पैसे व्याजासह परत केले असतानाही त्यांची जागा व घर परत न केल्याने व मानसिक त्रासास कंटाळून फिर्यादीने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उपरोक्त चार जणांच्याविरोधात अवैध सावकारकी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील म्हणाले, अवैध सावकारी वरुन लोकांची आर्थिक लूट होत असेल व मानसिक त्रास दिला जात असेल तर अशा लोकांनी करकंब पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. त्यांना योग्य न्याय देण्याचे काम केले जाईल. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT