Akash Bhosale, Juber mankar Sakal
सोलापूर

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू

दोन युवक जखमी झाले आहेत

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा /महाबळेश्वर - मंगळवेढ्यातील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघालेल्या आकाश भोसले याचा महाबळेश्वर शहरापासून एक किमी अंतरावर हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील वळणावर तीन दुचाकींची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर दोन युवक जखमी झाले आहेत. मृत भोसलेच्या वडीलाचे कोरोनात निधन झाले. भोसलेच्या निधनाने कुटुंबाचा आधारवड हिरावला. हा अपघात रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाला.

महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने हिरो डिलक्स एम एच १३ सीआर ७१९३ ही भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटार सायकल एमएच १२ सीडब्यू २७६७ व एम एच ११ सी आर ३७४४ या दुचाकींशी होऊन हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (३०) रा. नगरपालीका सोसा., महाबळेश्वर, आकाश तानाजी भोसले (२९) रा. मंगळवेढा जि. सोलापुर‌‌ या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर अमिन बिस्मिल्ला शेख रा. महाबळेश्वर व दरिबा सुनिल बळवंतराय उर्फ गोट्या रा. मंगळवेढा हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्नालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

या अपघाताची खबर रमिज खाजा वारुणकर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिरो डिलक्स एमएच १३ सीआर ७१९३ चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पो.नी. संदीप भागवत करीत आहेत. या अपघातात मृत्यू पावलेलया जुबेर मुस्तफा मानकर या युवकाचा दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad: हार्दिक पांड्याकडे पुन्हा उप कर्णधारपद? शुभमन गिलच्या निवडीवरून माजी खेळाडूचं मोठं विधान, बरोबर १ तासानंतर 'गेम' होणार?

Thane Politics: ठाकरे गटाला मोठं खिंडार! बड्या शिलेदारानं सोडली साथ, हाती कमळ घेतं भाजपात प्रवेश

Ajwain Water at Night: वजन, पचन आणि पोटाची चरबी! दररोज 21 दिवस ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात होतात 'हे' बदल

Karad News : सोमनाथ भोसलेंनी साकारलेली ११ फुटी हनुमानाची मूर्ती लवकरच ऑस्‍ट्रेलियाला होणार रवाना

Bangladesh Crisis: बांगलादेश पेटला! युवा नेत्याच्या हत्येनंतर राजधानीत आग, वर्तमानपत्रांची कार्यालये जळाली; देश अराजकतेच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT