CRIME sakal
सोलापूर

बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! गुन्हा दाखल

राजकुमार शहा

ही घटना तालुक्यातील ढोक बाभळगाव येथे घडली.

मोहोळ (सोलापूर): आज्जीला मिळालेल्या जमिनीवरती वारसा हक्काने एकुलत्या एक मुलाची वारस नोंद असताना त्याच्या चुलत भावाने माजी सरपंच, गावकामगार तलाठी, मंडल अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील, व कोतवाल यांना हाताशी धरून मयताचे बोगस कागदपत्रे दाखले, खोट्या सह्या, बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनीवर सात जणांची बोगस नोंद लावल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व सरपंचासह 13 जणावर मोहोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना तालुक्यातील ढोक बाभळगाव येथे घडली.

या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, देविदास मनोहर बेलेराव यांची आजी अफ्रुका लक्ष्मण बेलेराव हिला शासनाकडून गायरान जमीन मिळाली होती. अफ्रुका बेलेराव यांच्या मृत्यूनंतर सदर जमिनीवरती अफ्रुका यांचा नातु देविदास मनोहर बेलेराव यांचे नाव लागले होते. असे असताना देविदास बेलेराव यांचे चुलत भाऊ विकास बेलेराव यानी 1 जुलै 2021 रोजी त्या जमिनीवर आम्हा भावांची नावे लावावीत म्हणून तलाठयाकडे अर्ज केला होता. त्या अर्जानुसार ढोकबाभुळगाव च्या तलाठ्याने बोगस नोटीसा काढल्या तसेच फिर्यादी ची आज्जी अफ्रुका ही सोलापूर येथे मयत झाली असताना ती ढोकबाभुळगाव येथे मयत झाल्याचा खोटा दाखला ग्रामसेवकाकडून घेतला.

याबरोबरच ढोकबाभुळगावचे सरपंच, पोलिस पाटील, कोतवाल या सर्वांना हाताशी धरून खोट्या सह्या व बोगस दाखले घेवून त्या जमीनीवर फिर्यादी एकटा वारस असताना इतर सात जणांची नावे वारसदार म्हणून नोंद केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी देविदास बेलेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ढोक बाभुळगावचा कामती विभागाचा मंडल अधिकारी सुनिल केरबा बेलभंडारे, तलाठी सिद्धेश्वर हरीविजय नकाते, ग्रामसेवक मिलिंद कृष्णाजी तांबीले, महिला सरपंच रुक्मिणी राजाराम पांढरे, कोतवाल राजेद्र जालिधंर कुंभार, यांच्या सह माजी सरपंच बंडू शंकर मुळे, विकास गंगाराम बेलेराव, तानाजी दशरथ बेलेराव, सरूबाई शिवाजी बेलेराव, रुक्मिणी सतीश माने, जनाबाई गगाराम बेलेराव, जनार्धन गंगाराम बेलेराव, संगीता शिवाजी सुरवसे या तेरा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT