ujani dam water to mangalwedha ajit pawar pressurized officials says bhagat  Sakal
सोलापूर

Mangalwedha News : मंगळवेढ्यास उजनीचे पाणी देण्यास अजितदादांचा दबाव - भगत

वेळप्रसंगी आंदोलनाच्या मार्गाने न्याय देताना शिवसैनिकात जोश निर्माण करणार

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या हिश्यातील उजनीत पाण्याची उपलब्धता असून सूध्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावामूळेच पाणी सूटण्यास अडचण निर्माण होत असल्याचा आरोप शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष प्राध्यापक येताळा भगत यांनी केला.

तालुकाध्यक्षपदी प्राध्यापक येताळा भगत व शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले यांची नुकतीच निवड झाल्यानंतर तालूका व शहर शिवसेना, तालूका व शहर यूवासेना व महिला आघाडीची कार्यकारिणीची बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना प्रा. भगत म्हणाले की,तालूका आज दूष्काळी परिस्थितीशी झगडत असताना प्रशासन मात्र टिगर एक, दोन, तीन च्या घोळात अडकवून तालूक्यातील तमाम शेतकय्राना वाय्रावर सोडत आहे,पिक विम्यामध्ये पात्र असताना पिकविम्याची अग्रीम देण्यास तयार नाही,

मंगळवेढ्याच्या बाहेरून जाणाय्रा बायपासवरून बोराळे रस्त्याला शेती असणाय्रा शेतकरी असेल,बोराळे मूंढेवाडी, रहाटेवाडी, अरळी सिध्दापूरला ये_जा करणारास आता सध्या व भविष्यात अडचणी निर्माण होत आहेत.

तेव्हा रस्ते विकास महामंडळाकडे जूना बोराळे रोड अंडरग्रांऊड रस्ता करणेसाठी ,केसरी कार्डधारकाना धान्य उपलब्ध करणे, शहरातील रस्ते व आरोग्यासंबंधी प्रश्न,तालूक्यातील अवैध व्यवसायाबाबत संबंधिताना प्रथम निवेदने देणार आहे.

वेळप्रसंगी आंदोलनाच्या मार्गाने न्याय देताना शिवसैनिकात जोश निर्माण करणार आहे. पक्ष संघटनेने माझ्यावर तिसय्रावेळी जबाबदारी दिली,पक्षामध्ये पूर्वीचे दिवस वेगळे होते ,समीकरणे वेगळी होती पण आज पक्ष संघटनेपूढे वेगळी आव्हाने आहेत.

बाळासाहेबाच्या विचाराचा ,उध्दवसाहेबाची प्रेरणा घेवून काम करणारा शिवसैनिक, आदित्य ठाकरेचा आवेश घेवून काम करणारा यूवासैनिक असेल या सर्वाना संघटित करून पक्ष संघटना वाढविणार असल्याचे सांगितले.

शहराध्यक्ष दत्ता भोसले यानी शहराची जबाबदारी पार पाडत असताना शिवसेना भक्कम करून पक्ष संघटनेला गतवैभव निर्माण करण्यासाठी सर्वाना विश्वासात घेवून काम करणार असल्याची ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT