उपळाई बुद्रूक (सोलापूर) : सध्या सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, माढा तालुक्यात कोरोनाने कहरच केला आहे. उपळाई बुद्रूक येथे एकाच कुटुंबात एकदम 25 जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील सहाजणही पॉझिटिव्ह निघाले. मात्र, 15 दिवसांतच सर्व 31 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाल्याने उपळाई बुद्रूक गाव कोरोनामुक्त झाले आहे.
हेही वाचा : Breaking! "एवढी' सेवापुस्तके अपूर्ण; आयुक्तांचे विभागप्रमुखांना वेतनवाढ थांबविण्याचे पत्र
उपळाई बुद्रूक येथे एकाच कुटुंबात एकदम 25 जण कोरोनाबाधित आढळले व त्यांच्या संपर्कातील सहाजणही पॉझिटिव्ह निघाले. एकूण 31 रुग्णसंख्या झाल्यामुळे या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण गावात "कडक जनता कर्फ्यू' जाहीर करण्यात आला होता. एकाच कुटुंबात एकदम इतकेजण पॉझिटिव्ह येण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असेल. परंतु माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, उपळाईचे सरपंच संजय नागटिळक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी तातडीने योग्य ती पावले उचलत कडक जनता कर्फ्यू तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांच्या तातडीने तपासणी केल्यामुळे उपळाई बुद्रूक येथील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव खंडित झाला व जे कोरोनाबाधित आढळले होते, त्यांनी देखील 15 दिवसांच्या आत कोरोनावर यशस्वी मात करत घरी आले. त्यामुळे उपळाई बुद्रूक गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून गाव कोरोनामुक्त झाले आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादी बदलतेय... सत्तेतील चुका सुधारतेय
गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर आणखी रुग्ण वाढू नयेत यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण व माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने सतत दोन दिवस गावात येऊन प्रतिबंधात्मक क्षेत्रातील लोकांशी स्वतः चर्चा करून धीर देत होते.
याबाबत उपळाई बुद्रूकचे सरपंच संजय नागटिळक म्हणाले, नागरिकांनी जनता कर्फ्यूला चांगले सहकार्य केले. शासनाच्या आदेशाचे गावात तंतोतंत पालन करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा गावातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यात यश आले. यासाठी माढा तहसीलदार, माढा पोलिस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व विशेष म्हणजे गावातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.