Ashwini Wakade 
सोलापूर

अधिकाऱ्यांच्या गावात अजून एक आयएएस अधिकारी! उपळाई बुद्रूकच्या अश्विनी वाकडे यांचे यश 

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : अधिकाऱ्यांचे गाव अशी राज्यात ओळख असलेल्या उपळाई बुद्रूक (ता. माढा) गावात अजून एक अधिकाऱ्याची भर पडली आहे. निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवले. माढा तालुक्‍यातील (बोकडदरवाडी) उपळाई बुद्रूक येथील अश्विनी तानाजी वाकडे यांनी 200 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत घवघवीत संपादन केले आहे. 

अश्विनी तानाजी वाकडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद, घेरडी (ता. सांगोला) तर माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर (ता. मोहोळ) तर अकरावी व बारावीचे शिक्षण शिवाजी कॉलेज, बार्शी येथे झाले. एमबीबीएसचे शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. दोन वेळा यशाने हुलकावणी दिली होती, तरीदेखील न खचता कष्ट, जिद्द व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात तिसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे. वडील पोलिस खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत, तर त्यांचे मोठे बंधू अमरदीप वाकडे हे कराड (जिल्हा सातारा) येथे कार्यरत आहेत. तर दुसरी मोठी बहीण मीनाक्षी वाकडे या लातूर येथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. छोटे बंधू अमित वाकडे यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले असून, ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. घरातील मोठे भाऊ, बहीण व वडील हे सर्वच प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने व घरात शैक्षणिक वातावरण असल्याने अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले आहे. 

उपळाई बुद्रूक हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून राज्याला परिचित आहे. त्यात अजून एका अधिकाऱ्याची भर पडली असल्याने नागरिकांतून कौतुक होत आहे. यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयएएस रोहिणी भाजीभाकरे, आयएएस शिवप्रसाद नकाते, आयआरएस स्वप्नील पाटील यांनी यश मिळवले आहे. 

या यशाबद्दल अश्‍विनी वाकडे म्हणाल्या, आई, वडील, भाऊ व बहीण यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे. अपयश आले तरी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करा, यश नक्की मिळते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT