plastic bag.jpg 
सोलापूर

बाजारपेठेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू 

राजाराम माने

केतूर(सोलापूर) : पाणी प्रदूषण व इतर प्रदूषणास सर्वात घातक असलेला प्लास्टिक पिशव्यांच्या (कॅरीबॅग) वापरावर फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतर काही दिवस व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येत होती. त्यानंतर व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्याला बायबाय करून कागदी तसेच कापडी पिशव्यांचा वापर वाढला होता, परंतु कोरोना महामारीच्या लॉकडाउननंतर मात्र, पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे सर्रासपणे होताना दिसत आहे. 


शहरातील व्यापारी, छोटे व्यवसायिक, भाजी विक्रेते, फुल विक्रेते, मेडिकल दुकाने ग्राहकांना माल देताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहेत. 

प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर पुन्हा दंडात्मक कारवाई होणार का ? ही कोण करणार असा प्रश्‍न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विचारला जात आहे. प्लास्टिक पिशव्यामुळे शहरी भागात पावसाळ्यात गटारे तुंबण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत तसेच फिरस्ती जनावरेही या प्लास्टिक पिशव्या खात असल्याने त्यांना त्रास होत आहे. 

निर्णयाची अंमलबजावणई व्हावी 
पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी मध्यंतरी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय योग्य असाच होता त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. 
- कल्याणराव साळुंखे, पर्यावरणप्रेमी, कुंभेज (ता.करमाळा)  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT