walse patil photo
walse patil photo 
सोलापूर

वळसे-पाटील म्हणाले, "दिल्ली' च्या शाळा बघून या 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी यांनी नवी दिल्ली येथील शाळांचे कामकाज पाहून यावे. त्या पद्धतीने आपल्यातील शाळा करण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आज पालकमंत्री वळसे-पाटील यांनी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. सोलापूरचा विकास गतीने होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आराखडा करण्याची सूचनाही त्यांनी केली. 
हेही वाचा - वळसे-पाटलांचे सिद्धेश्‍वरच्या चिमणीला जीवदान? 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते. पालकमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितले जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प प्रलंबित आहेत. काही प्रकल्प निधी अभावी तर काही प्रकल्प प्रशासकीय अडचणी अभावी प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध करून देण्याचा विषय राज्यस्तरावरुन सोडविण्यात येईल मात्र, प्रशासकीय अडथळा दूर करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पुढाकार घेण्याचीही सूचना त्यांनी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, धीरज साळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, वस्त्रोद्योग विभागाचे किरण सोनवणे आदींनी सादरीकरण केले. 
हेही वाचा - महाभरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी 
पोलिसांच्या राहण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य 
आषाढी आणि कार्तिकी वारीला बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था केली जाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली होती. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचनाही श्री. वळसे-पाटील यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT