walse patil photo 
सोलापूर

वळसे पाटलांचे सोलापूर जिल्ह्यात जंगी स्वागत 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्याचे कामगारमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील शुक्रवारी रात्री पंढरपूरला मुक्कामी आले होते. पंढरपूरनंतर ते आज सकाळी मोहोळमार्गे सोलापूरला आले. पालकमंत्री झाल्यानंतर वळसे-पाटील पहिल्यांदाच सोलापूरला आल्याने सोलापूर, मोहोळ, पंढरपूर या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 
हेही वाचा - खंडणी मागणारा धाडसचा अध्यक्ष पोलिसांच्या जाळ्यात 
मोहोळमध्ये माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. सोलापूर शहरात आगमन झाल्यानंतर शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी स्वागत केले. वळसे-पाटील सोलापुरात आल्यानंतर शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. सोलापुरात त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते. सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 
हेही वाचा - परितेचा योगेश रक्ताच्या कर्करोगाशी लढतोय 
आज दुपारी सोलापुरातील शिवछत्रपती रंगभवन सभागृहात शहर व जिल्हा राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या स्वागतासाठी जागोजागी कमानी उभारण्यात आल्या आहेत. वळसे-पाटील यांच्यासोबत या वेळी आमदार भारत भालके, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील, उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT