vadhuvar parichay.jpg 
सोलापूर

वीरशैव लिंगायत' चा रविवारी राज्यस्तरीय वधूवर मेळावा 

शाम जोशी

द. सोलापूर(सोलापूर)ः वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्यावतीने लिंगशेट्टी मंगल कार्यालयात रविवारी (ता.23) सकाळी दहा वाजता सहावा राज्यस्तरीय वधू वर मेळावा होणार असून यावेळी "महाराष्ट्र वीरशैवरत्न' पुरस्काराचे वितरणही होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विरभद्रेश बसवंती यांनी आज (ता.23) पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे, उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, वधू-वर मेळाव्याचे कार्याध्यक्ष केदार बिराजदार, सल्लागार जगदीश पाटील, इरप्पा सालक्की, केदार उंबरजे, सुदीप चाकोते, संचालक विरेद्र हिंगमिरे, सहसिचव गुरूनाथ निंबाळे, सहखजिनदार सुनिल शरणार्थी उपस्थित होते. 

मेळाव्याचे उद्‌घाटन खासदार जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, रेणुकशिवाचार्य हिरेमठ मंद्रूप, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी प्रह्मलिंगश्‍वर बृहन्मठ नागणसूर, शिवपुत्र महास्वीम मठाधीश, वेदमूर्ती बसवराज शास्त्री महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुधीर खरटमल आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेंद्र हिरेमठ, माजी आमदार रविकांत पाटील, प्राचार्य गजानन धरणे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, उद्योजक श्रीशैल काबणे, महादेव कोगनूरे, न्यायाधिश ऍड. प्रयंका लिगाडे, वाहन उपनिरिक्षक श्‍वेता नरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यंदा कोरोनामुळे हा वधू वर मेळावा मर्यादित असून शहरातील वधू वर व त्यांचे पालक यामद्ये सहभागी होऊन वधू वर व पालक ऑनलाईन सहभागी होणार असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. या मेळाव्याच्या कार्यक्रमातच महाराष्ट्र वीरशैवरत्न पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार कोरोना काळा मृत्यूमुखी पडलेल्या 1हजार 400 मृत व्याक्तीवर अंत्यसंस्कार केलेल्या पुणे येथील अरूण जंगम यांना देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मेळाव्यात प्रतिष्ठान व अंबिका नवरात्र व्यापारी मंडळाच्या वतीने प्लाझ्मासह रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यानंतर 25 दिवसांनी मेळाव्यात सहभागी वधू वरांची माहीती पुस्तिकारूपाने छापण्यात येणार असल्याचे केदार बिराजदार यांनी सांगितले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपाची जोरदार तयारी

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT