Corona Medicin 
सोलापूर

जिल्ह्याने मागणी केली 1800 रेमडेसिवीर इंजेक्‍शनची ! टेस्टिंगसाठी हवेत तीन लाख रॅपिड अँटिजेन किट 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हानिहाय औषध साठ्यांचा आढावा घेतला असून, आणखी किती गरज आहे, याची माहिती तातडीने मागविली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी 1800 रेमडेसिवीर तर टॉसिलीझुमब इंजेक्‍शनची एक हजार 50 इतकी गरज असल्याची मागणी आरोग्याधिकाऱ्यांनी कळविली आहे. दुसरीकडे, संशयितांच्या टेस्टसाठी दहा हजार आरटीपीसीआर तर दोन लाख 70 हजार रॅपिड अँटिजेन किट द्यावेत, असेही मागणीपत्रात नमूद करण्यात आले आहे. 

आतापर्यंत सोलापूर शहरातील 12 हजार 217 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, सध्या 448 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातील 40 हजार 239 व्यक्‍तींना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 365 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या आटोक्‍यात यावी, या हेतूने संशयितांचे टेस्टिंग वाढविले जाणार आहेत. तर कोरोनाची दुसरी लाट आल्यास रुग्णांवर तत्काळ उपचार करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने औषधांची मागणीही करण्यात आली आहे. आतापर्यंत आठ हजार रेमडेसिवीर तर 60 हून अधिक टॉसिलीझुमब इंजेक्‍शनचा वापर झाला आहे. तसेच फॅविपिरावीर गोळ्यांद्वारे रुग्णांवर उपचार करण्यात आले असून सध्या एक लाखाहून अधिक गोळ्यांचा साठा शिल्लक आहे. एका रुग्णाला 34 गोळ्या दिल्या जातात आणि आगामी पाच महिने पुरेल इतक्‍या गोळ्या आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने सोलापूर महापालिका, सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून आगामी दोन-अडीच महिने पुरेल इतक्‍या औषधांची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या तीनशे रेमडेसिवीर शिल्लक असून पाच हजार पीपीई किट आहेत. रॅपिड अँटिजेनचे अवघे दोन हजार किट शिल्लक असून मास्क खरेदी केले जाणार आहेत. 


शहर-जिल्ह्यातील औषधसाठा 

  • रेमडेसिवीर : 1,428 
  • टॉसिलीझुमब : 0000 
  • पीपीई किट : 22,000 
  • रॅपिड अँटिजेन किट : 70,000 
  • फॅविपिरावीर गोळ्या : 1.27 लाख 

औषधांची मागणी 

  • रेमडेसिवीर : 1,800 
  • टॉसिलीझुमब : 1,050 
  • पीपीई किट : 20,000 
  • रॅपिड अँटिजेन किट : 2.70 लाख 
  • एन-95 मास्क : 1.89 लाख 

औषध, गोळ्यांची मागणी कळविली 
कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाने औषधांचा उपलब्ध साठा आणि आवश्‍यक असलेल्या औषधांसंबंधी मागणीपत्र पाठविले आहे. त्यानुसार सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी लागणारी औषधे व वैद्यकीय उपकरणे तसेच साहित्यांची मागणी कळविण्यात आली आहे. 
- डॉ. बिरुदेव दूधभाते, 
आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Controversy : टी-२० वर्ल्डकपच्या वादात आता शाहीद आफ्रिदीची उडी; ICC वर केले गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाला?

Nashik Crime : खळबळजनक! ४०० कोटींच्या कंटेनर लुटीप्रकरणी पाच आरोपींना पोलीस कोठडी; 'एसआयटी'चा वेगाने तपास

Nagpur News: दहावीच्‍या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं; भावाने खोलीचे दार उघडलं धक्काच बसला, आईने फोडला हंबरडा!

Latest Marathi news Live Update: तुळजापुरात सलग सुट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Government Jobs: भारत सरकारसोबत काम करण्याची सुवर्णसंधी! या लोकांना मिळणार चान्स, अर्ज करा लगेच!

SCROLL FOR NEXT