mp solapur 
सोलापूर

खासदारांचे पुरावे पडताळणीसाठी दक्षता समितीकडे 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे असलेले बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचा मुद्दा पुढे करत सोलापूरच्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने खासदारांना नोटीस बजावली आहे. या नोटीसवर आज सुनावणी झाली असून या सुनावणीत खासदारांनी 1944 व 1947 या सालातील पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे पडताळणीसाठी दक्षता पथकाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणावर आता शनिवारी (ता. 1) सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे. 
हेही वाचा - अबब...वाचा, सोलापूर जिल्हा बॅंकेच्या ठेवींचे टार्गेट 
समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सूळ, सदस्य संतोष जाधव, छाया गाडेकर, पोलिस अधीक्षक एस. व्ही. भट आणि पोलिस निरीक्षक एम. के. नाईकवाडी यांच्या समितीसमोर आज सुनावणी झाली. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे वडील गुरुबसय्या नूरुंदया हिरेमठ हे बापू यमाजी पाटील यांची जमीन कसत असल्याचा हा पुरावा आहे. या जमिनीच्या फसल उताऱ्यामध्ये बसय्या नूरुंदया हिरेमठ हे बेडा जंगम बटाईने आठ वर्षे कसतो अशी नोंद आढळली आहे. हे पुरावे दाखल केल्यानंतर जात पडताळणी समितीने दोन्ही पुरावे दक्षता पथकाकडे पाठवून त्या बाबतचा अहवाल दक्षता पथकाकडून मागविला आहे. जातपडताळणी समिती खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या वकिलांनी 1950 पूर्वीचे दोन मोठे पुरावे सादर केले आहेत. 
हेही वाचा - शेतकऱ्यांना "कशासाठी' हवा दिवसा वीजपुरवठा 
तक्रारदाराकडून जात पडताळणीचे अध्यक्ष व सदस्यांना दिलेल्या धमकी बाबत व न्यायालयाचा अवमान केल्याबाबत त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करावी असा अर्ज खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांच्या तर्फे ऍड. संतोष न्हावकर यांनी दिला होता. त्यावर समितीने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मागवावे व त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे अवमान याचिका दाखल करावी व सदर संपूर्ण प्रक्रिया अंतिम निकालापूर्वी करण्यात यावी अशी नव्याने अर्ज दाखल करून मागणी करण्यात आली आहे. खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या तर्फे ऍड. संतोष न्हावकर, औरंगाबादचे ऍड. महेश स्वामी ऍड. योगेश कुरे हे काम पाहत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?

SCROLL FOR NEXT