राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती! अजित पवारांच्या गाडीतून कोठेंचा प्रवास
राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती! अजित पवारांच्या गाडीतून कोठेंचा प्रवास Canva
सोलापूर

राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मोहिते-पाटलांची उपस्थिती !

तात्या लांडगे

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारिणी बैठकीला विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत उपस्थित राहिल्याने त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीवेळी अकलूज (Akluj) येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) सभेला विजयसिंह मोहिते-पाटील (Vijaysingh Mohite-Patil) यांनी आवर्जून उपस्थिती लावली. भाजपने (BJP) त्यांची नाराजी हेरून रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांना विधान परिषदेवर संधी दिली. विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील कुटुंबातील बहुतेक सदस्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला. तेव्हापासून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट झाली नाही. मात्र, मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यकारिणी बैठकीला विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत उपस्थित राहिल्याने त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी (ता. 21) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंधारण मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बबनराव शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी मोहिते-पाटील कुटुंबातील बरेचजण राष्ट्रवादीपासून दुरावल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नामुळेच भाजपचे राम सातपुते हे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. दरम्यान, त्यांनी मंगळवारच्या बैठकीच्या निमित्ताने लावलेली उपस्थिती भविष्यातील राजकारणाच्या उलथापालथीची नांदी तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली. मात्र, बैठक संपल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील लगेच तिथून निघून गेल्याने त्यांचा पक्षाशी दुरावा कायम असल्याचेही बोलले जात आहे.

कोठे म्हणाले, टेक्‍स्टाईल भवनसाठी भेटलो

मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथून पुणे विमानतळापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश कोठे यांना गाडीत बोलावून घेतले. 25 मिनिटांच्या या प्रवासात त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही होते. त्यावेळी प्रभाग रचना, महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी होऊ शकते का, सध्या शहर-ग्रामीणमध्ये काय चालले आहे, यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. परंतु, सोलापूर शहरातील टॉवेल व चादर उत्पादकांचे मार्केटिंग व त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून अक्‍कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील स्मशानभूमीशेजारील जागेत टेक्‍स्टाईल भवन उभारणे, सोलापुरात आयटी पार्क उभारण्यासंदर्भात भेटलो, असे स्पष्टीकरण कोठे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT