Drone 
सोलापूर

स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांची ड्रोनद्वारे होणार मोजणी; "या' तालुक्‍यातील दहा गावांचा समावेश 

संतोष सिरसट

सोलापूर : स्वामित्व योजनेअंतर्गत गावठाणांचे भूमापन करून मिळकत पत्रिका देण्याच्या राज्य शासनाच्या उपक्रमाला सुरवात झाली आहे. या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील दहा गावांची निवड करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख उपअधीक्षक किरण कांगणे यांनी दिली. 

श्री. कांगणे म्हणाले, ड्रोनद्वारे सर्व गावांच्या मिळकतींची मोजणी मार्च ते मे या कालावधीत करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे ती करता आली नाही. राज्य शासनाने सध्या एक हजार गावांतील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी करून दोन ऑक्‍टोबरपर्यंत मिळकत पत्रिका देण्याचे निश्‍चित केले आहे. यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील शिरवळ, इंगळगी, आलेगाव, बोरूळ, कणबस, बंकलगी, तिल्हेहाळ, हिपळे, सिंदखेड, आचेगाव या गावांची निवड केली आहे. गावठाण भूमापन योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त योजना आहे. योजना यशस्वी होण्यासाठी आपल्या मिळकतीचे सीमांकन वेळेवर करून घ्यावे व ग्रामविकास अधिकारी / भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कांगणे यांनी केले आहे. 

स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये व फायदे 

  • गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार 
  • धारकांना मिळकतीचे सीमा व नेमके क्षेत्र कळणार 
  • गावठाणातील धारकांना मालमत्तेचे अधिकार मिळणार 
  • विविध आवास योजनेअंतर्गत मंजूरी करणे सुकर होईल 
  • मालमत्तेचे मालकी हक्क संबंधी अभिलेख व नकाशे तयार झाल्याने आर्थिक पत उंचावेल 
  • गावठाणातील जागेचे मालकी व हद्दीसंबंधी वाद/तंटे संपुष्टात येतील 
  • गावठाणातील जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टळेल 
  • गावठाणातील सार्वजनिक जागा, बखळ जागा, रस्ते, नाले यांचे नकाशे व अभिलेख तयार होणार असल्याने सार्वजनिक मालमत्ताचे होणार संरक्षण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Rahul Gandhi:गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ:राहुल गांधी, भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार,भेदभावात वाढ!

Latest Marathi News Live Update : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Akola News: जिल्हा स्त्री रुग्णालयाला कायमस्वरूपी अधीक्षक; डॉ.बापुराव पवार यांची नियुक्ती : आज पदभार स्वीकारण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT