kanda aandolan.jpg
kanda aandolan.jpg 
सोलापूर

कांदा निर्यातबंदी विरोधात शहरात कॉंग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने

प्रकाश सनपूरकर


सोलापूरः केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकरी, व्यापाऱ्यांवर लादला तो अन्यायपूर्वक निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापूर शहर कॉंग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवन सोलापूर समोर येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, देशात महाराष्ट्रात लॉकडाउन असताना सुद्धा मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला आत्ता कुठे भाव चांगला येऊ लागल्याचे दिसत होते चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानकपणे निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यावर घोर अन्याय केला आहे. तीन महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळींना जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. त्यानंतर तीन महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. 

या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. मोदी सरकारच्या या लहरी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या मध्ये वाढ होत आहे. तसेच कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी पाठविलेले शेकडो कांदयाचे कंटेनर मुंबई पोर्टवर उभे आहेत. कांदा नाशवंत असल्यामुळे व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार आहे. मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. 
यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, केदार ऊंबरजे, रेवनसिद्ध आवजे, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष हरीष पाटील, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष गौरव खरात, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, एन.डी. जावळे, दिनेश उपासे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, बसवराज बगले, सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश सेवादल चे अशोक कलशेट्टी, माजी नगरसेवक जेम्स जंगम हारून शेख, आझम सैफन, व्हिजेएनटी युवक अध्यक्ष युवराज जाधव, माणिकसिंग मैनावाले, अख्तर मनियार, अरुण साठे, विवेक कन्ना, योगेश मार्गम, सैफन शेख, नागनाथ कदम, संभाजी भोसले, अशोक देवकते, योगेश दुलंगे, उमेश यादवाड, हसीब नदाफ, नूर अहमद नालवार, सायमन गट्टू, मुन्ना बिराजदार, दत्तात्रेय नामकर, चक्रपाणी गज्जम, अनिल मस्के, सतीश संगा, संतोष अट्टेलुर, श्रीकांत दासरी, किसन मेकाले गुरुजी, शोभा बोबे, रंजना इरकर, मुस्कान शेख, सोमनाथ व्हटकर, रेवन चव्हाण, शिवराज कोरे, प्रमिला तूपलवंडे, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, अनिता भालेराव, मीना गायकवाड़, अरुणा बेंजरपे, शोहेब कडेचुर, नरेश महेश्वरम, राकेश मंतेन, आनंद मैले, लालू सानी, रवि हुन्डेकरी, यांच्यासह इतर पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT