नांदेड- पंढरपूर, तिरुपती- लातूर रेल्वेचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे  Sakal
सोलापूर

सोलापूर : मराठवाड्यातील वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शन सुकर

नांदेड- पंढरपूर, तिरुपती- लातूर रेल्वेचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे

विजय थोरात

सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठुराया व श्रीक्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थान ही धार्मिक तीर्थस्थळे कर्नाटकसह मराठवाड्याला जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. नांदेड-पंढरपूर- नांदेड आणि तिरुपती- लातूर- तिरुपती या दोन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाचे दर्शन घेणे आता सुकर होणार आहे.

यासाठी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी यासाठी मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव आता दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आल्याने या गाड्या लवकरच सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लातूरचे खासदार शृंगारे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे नांदेड-पंढरपूर-नांदेड, तिरुपती-लातूर-तिरुपती या गाड्यांसाठीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर सातत्याने पाठपुरावा करुन हा प्रस्ताव आता मध्य रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठविला आहे. यावर लवकरच दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक निर्णय होईल, असा विश्‍वासदेखील त्यांनी व्यक्‍त केला आहे. नांदेड- पंढरपूर एक्‍सप्रेस कुर्डुवाडीमार्गे आणि तिरुपती-लातूर एक्‍सप्रेस लातूररोड, उदगीर, भालकी, खानापूर, कलबुर्गीमार्गे सुरू करण्याची मागणी अनेक रेल्वे संघटनांनी आणि प्रवासी संघटनांकडू यापूर्वीच लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडे केली होती. प्रस्तावित तिरुपती गाडीमुळे लाखो भक्तांची सोय होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्यापही सोलापूर विभागातील सोलापूर- कोल्हापूर, इंद्रायणी एक्‍सप्रेस आदी गाड्या बंदच आहेत. नांदेड- पंढरपूर गाडीमुळे पंढरपूर, कुर्डूवाडी, उस्मानाबाद, लातूर रोड, नांदेड येथील वारकऱ्यांना आता सावळ्या विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच गाडीच्या वेळापत्रकासह थांबे निश्‍चित करून रेल्वेबोर्डाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी माहिती दिली आहे.

असा असणार रेल्वे गाड्यांचा मार्ग

लातूर- तिरूपती एक्‍सप्रेस या गाडीचा मार्ग लातूररोड- उदगीर- बिदर- हुमनाबाद- गुलबर्गा- गुंटकल- कडप्पा- तिरूपती असा असणार आहे. तर, नांदेड- पंढरपूर गाड्यांचा मार्ग नांदेड- परभणी- परळी वैजनाथ- लातूररोड- लातूर- धाराशिव- बार्शी- कुर्डूवाडी- पंढरपूर असा असणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT