E-Rikshaws 
सोलापूर

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीला मिळणार दोन ई-रिक्षा भेट ! वृद्ध, अपंग व रुग्ण भाविकांची होणार सोय

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल मंदिर परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव वाहनांना बंदी आहे. त्यामुळे वृद्ध भाविक व रुग्णांना मंदिराकडे चालत जावे लागते. अशा भाविकांच्या सोईसाठी माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने फेरारी गाडीप्रमाणे गिअर बॉक्‍स असलेल्या बॅटरीवर धावणाऱ्या दोन ई- रिक्षा मंदिर समितीला भेट देण्यात आल्या. त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी (ता. 21) होणार आहे. आग्रा येथील ताजमहल आणि श्रीशैलम येथील मंदिर परिसरात अशा रिक्षांचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. 

श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेच्या कारणास्तव महाद्वार पोलिस चौकी आणि चौफाळा अशा दोन ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्‌स बसवण्यात आले आहेत. मंदिराकडे सर्वसामान्य भाविकांची वाहने सोडली जात नाहीत. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वृद्ध, आजारी आणि अपंग भाविकांना बॅरिकेडपासून चालत मंदिराकडे जावे लागते. या भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मंदिर समितीच्या सदस्या ऍड. माधवी निगडे यांनी उपाययोजना करण्याचे ठरवले होते. 

सुमारे दहा लाख रुपये किमतीच्या प्रदूषणमुक्त असलेल्या दोन ई- रिक्षा निगडे वेल्फेअर फाउंडेशन आणि वेणू सोपान वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने मंदिर समितीला भेट देण्यात आल्या असून, त्यांचा लोकार्पण सोहळा रविवारी होणार आहे. 

या रिक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या बॅटरीवर चालणार असल्याने त्या चालवण्यासाठी इंधनाचा खर्च करावा लागणार नाही. फेरारी गाडीप्रमाणे या रिक्षांना गिअर बॉक्‍स आहेत. 

मंदिर समितीला भेट देण्यात आलेल्या दोन्ही रिक्षांच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी देखील आम्ही घेतली आहे. काही वर्षांनंतर या रिक्षा बदलण्याची वेळ आली तर पुन्हा आम्ही नवीन रिक्षा भेट देणार आहोत. आग्रा येथील ताजमहल आणि श्रीशैलम येथील मंदिर परिसरात अशा रिक्षांचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे, 
अशी माहिती ऍड. माधवी निगडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

चंद्रभागेच्या वाळवंटात वाहने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी केलेली आहे. त्यामुळे अंबाबाई मैदानाजवळ वाहने उभी करून भाविकांना चालत वाळवंटात जावे लागते. उन्हाळ्यात वाळवंटाकडे जाताना भाविकांची कमालीची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन दोन रिक्षांपैकी एका रिक्षाचा उपयोग अंबाबाई मैदानाकडून वाळवंटात जाऊ इच्छिणाऱ्या वृद्ध, अपंग भाविकांसाठी केला जावा अशी मागणी होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदेकरला मत, विकासाला मत! तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला; घोषणा देत बंडू आंदेकरसह लक्ष्मी, सोनालीने भरला अर्ज

BMC Electikon: कलानी गटाचा शिंदेसेनेत विलीन होणार? उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढणार

राजधानी हादरली! 'मसाज पार्लर'मध्ये काम करणाऱ्या पत्नीची तिसऱ्या पतीकडून निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, चारित्र्यावर होता संशय

Latest Marathi News Live Update : गुंड बंडू आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरण्यास दाखल!

Dhutpapeshwar : शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या धूतपापेश्वर मंदिराला नवा साज; ११ कोटींच्या सुशोभीकरणाने भाविक मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT