Vitthal Mandir 
सोलापूर

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर राहणार 31 जुलैपर्यंत बंद : मंदिर समितीचा निर्णय 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेऊन श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर देखील 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

कोरोना विषाणूचा संसर्ग भाविकांना होऊ नये यासाठी दक्षता म्हणून 17 मार्चपासून श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, हे लक्षात घेऊन आता 31 जुलैपर्यंत श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी पहाटे होणारी "श्रीं'ची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथंपर्यंतचे सर्व उपचार पूजा परंपरेनुसार करण्यात येत आहेत. सणवार, उत्सव परंपरेनुसार मात्र साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीने घेतला आहे, अशी माहिती समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Noida Tourism: मोदींनी एअरपोर्ट सुरू करताच तरुणाई सुसाट! विकेंडला फिरायला 'या' ४ ठिकाणांना मिळतेय पहिली पसंती

Hanuman Jayanti 2026: यंदा हनुमान जयंती 1 की 2 एप्रिलला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजाविधी

US-Iran Conflict : "नरकात तुमचं स्वागत, सैन्य पाठवाल तर बनेल कब्रस्तान; इराणचा अमेरिकेला थेट इशारा

Vardha News: भीषण अपघातात एक ठार, दोघे जखमी; कोसुर्ला शिवारातील घटना : ट्रिपल सीट बाईकला टिप्परने कट मारल्याने अपघात

Yavatmal News:१० हजार रस्ते बांधकामाचे नियोजन; आढावा बैठक; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT