ahilyadevi-holkar solapur univercity 
सोलापूर

मोठी बातमी ! 'यांच्या' मान्यतेने 'वालचंद अन्‌ हिराचंद नेमचंद'ला मिळाला स्वायतत्तेचा दर्जा 

तात्या लांडगे

सोलापूर : नॅकचा 'अ' दर्जा मिळालेल्या शहरातील वालचंद आणि हिराचंद नेमचंद महाविद्यालयांनी विद्यापीठापासून स्वायत्त होण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास व्यवस्थापन परिषदेने आज मान्यता दिली. त्यामुळे आगामी काळात आता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षेचे वेळापत्रक ठरविणे असे अधिकार या महाविद्यालयांना राहणार आहेत. मात्र, पुढील सहा वर्षे विद्यार्थ्यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचीच पदवी मिळणार आहे. 

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बुधवारी (ता. 22) बैठक झाली. त्यामध्ये मेडिक्‍लेमसह अन्य महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. मेडिक्‍लेमसाठी विद्यापीठाच्या 'वर्ग-एक'च्या अधिकाऱ्यांकडून दरमहा तीनशे रुपये, तर वर्ग दोन व तीनच्या कर्मचाऱ्यांकडून दरमहा दोनशे रुपये आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकडून दरमहा शंभर रुपये घेण्यात येणार आहे. राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मेडिक्‍लेम लागू करण्यासंदर्भात व्यवस्थापन बैठकीत अहवाल सादर केला होता. सदर अहवालावर सदस्यांनी चर्चा करून मान्यता दिली. योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी शहरातील नामांकित रुग्णालयासोबत करार करण्यात येणार आहेत. गुगल मीटद्वारे व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यात सहभागी झाले होते. बैठकीचे सचिव म्हणून कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले. 

स्वायत्त महाविद्यालयाचे असे चालते कामकाज 
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर स्वायत्त महाविद्यालयांना स्वत:चा अभ्यासक्रम ठरविणे, परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्याचा अधिकार दिला जातो. तत्पूर्वी, संबंधित विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदने त्यास मान्यता द्यावी लागते. त्यानंतर विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविणे, शिक्षणाची गुणवत्ता वाढावी म्हणून (नॅकचे 'ए' ग्रेड असलेली) महाविद्यालये सायत्त होतात. स्वायतत्ता मिळाल्यानंतर पुढील सहा वर्षे संबंधित विद्यापीठांकडूनच पदवी दिली जाते. त्यानंतर ती महाविद्यालये थेट विद्यापीठ अनुदान आयोगाशी संलग्न होतात. या महाविद्यालयांना स्वत:चा अभ्यासक्रम ठरविण्याचाही अधिकार असतो. संगमेश्‍वर महाविद्यालयास यापूर्वीच स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याची माहिती परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत 'हे' झाले निर्णय 

  • पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र व स्मारक समितीचा विस्तार करण्यास मान्यता 
  • विद्यापीठाच्या नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्‍लेम सुविधा (वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना) लागू करण्यास मंजुरी 
  • मेडिक्‍लेमसाठी 'वर्ग-एक'च्या अधिकाऱ्यांना दरमहा तीनशे रुपये, तर वर्ग-दोन व तीनच्या कर्मचाऱ्यांना भरावे लागणार दरमहा दोनशे रुपये 
  • अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध आजारांसाठी तीन लाखांपर्यंत वैद्यकीय खर्चासाठी प्रतिपूर्ती मिळणार 
  • मेडिक्‍लेमसाठी दरवर्षी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Professor Recruitment: आनंदाची बातमी! राज्यात लवकरच ६२०० प्राध्यापकांची मेगा भरती; वाचा याबाबत सविस्तर माहिती

Latest Marathi News Updates : ठेकेदाराच्या फायद्यासाठी नागरिकांना किडलेले धान्य? वखार महामंडळावर भ्रष्टाचाराचा आरोप

Parli Vaijnath Farmers: अतिवृष्टी बाधितांना तत्काळ मदत करा; किसान सभेची मागणी, पिकांच्या नुकसानीची केली पाहणी

Humanity Action:'गरजूंना उभे करताना घडतेय माणुसकीचे दर्शन'; बैतूलमाल कमिटीच्‍या कार्याची दखल, वर्षभरात ११० रुग्‍णांच्‍या सेवेसाठी १५ लाखांची मदत

Minor Girl : चिरमुरे भट्टीत कोण नसल्याचा अंदाज घेत तरूणाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनास्थळी जात रणरागिणी आईनं केलं धाडसी कृत्य

SCROLL FOR NEXT