सोलापूर

वालचंदचा "'एक पीक शिफारस आणि जोखीम चेतावनी प्रणाली" शोधनिबंध राज्यात प्रथम 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः अभियंता दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत बळीराजा एक पीक शिफारस आणि जोखीम चेतावनी प्रणाली या निबंधासाठी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयास विजेतेपद मिळाले. 

येथील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) च्या वतीने अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आयईआयच्या सोलापूर सेंटरच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये प्रथम वालंचद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बळीराजा एक पीक शिफारस आणि जोखीम चेतावणी प्रणाली या निबंधाला दहा हजाररुपयाचे पहिले बक्षिस जाहीर करण्यात आले. तसेच थर्मल इमेजिंग वापरुन स्तन कर्करोगाचे लवकर निदान या विषयावर बंगळुरूच्या सह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाला द्वितीय तर ग्रामीण भारताच्या विकासासाठी सेल्प सर्विंहग ग्रीड कनेक्‍ट सौर सिंचन प्रणाली या विषयावर संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर यांना तृतीय बक्षिस जाहीर करण्यात आले. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवाचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. व्ही.बी. कामत, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.एम.आर. चितलांगे, आयईआयचे सोलापुर सेंटरचे अध्यक्ष डॉ.एस.एस. पाटील, सचिव पी.के.मगदुम, माजी अध्यक्ष डॉ. जी.के. देशमुख, संचालक डॉ. एन.एस. काटीकर हे उपस्थित होते. 
यावेळी डॉ. चितलांगे यांनी सांगितले की, डॉ. विश्‍वेशरय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. नवतंत्रज्ञानाबरोबरच औद्योगीक विकासामध्ये प्रगती करणे काळाची गरज असून नाविन्याचा वेध घ्यावा. पर्यावरण पुरक व शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी अभियंत्यांनी प्रयत्नशील राहीले पाहिजे असे नमुद केले. गोवा राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. कामत यांनी सांगितले की, अभियंता हे संशोधनाचे स्त्रोत असुन आपल्या कल्पक व नाविन्यपुर्ण विचारामुळे नवनवीन संशोधन अभियंत्याकडुन होत असते. त्यामुळे कृषी, जलसंधारण व शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करुन समाजामध्ये सुक्ष्मसिंचन, पाणी बचत अशा संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. एन.एस.काटीकर यांनी केले तर पी.के.मगदुम यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संयोजक एन.एस. काटीकर, अध्यक्ष डॉ. एस.एस.पाटील, सचिव पी.के.मगदुम, एस.बी ठिगळे, एम.जी.कल्याणशेट्टी, एस.जी.शिरसीकर, एस.एम.मुकणे, पी.डी.भैरगुंडे आदींनी पुढाकार घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT