pandharpur swachhata.jpg 
सोलापूर

महापुरानंतर पंढरपूर शहरात युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम 

अभय जोशी

पंढरपूर(सोलापूर) : शहरातील पूर ओसरल्यानंतर नगरपालिकेने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सुमारे 200 टन कचरा उचलण्यात आला. ही मोहीम आठवडा भर सुरू ठेवून शहर स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. 

उजनी व वीर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने या दोन्ही धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर शहराच्या विविध भागात रस्त्यावर कचरा व गाळ झाला असून त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर नगरअभियंता नेताजी पवार यांच्या समवेत सर्व भागाची पाहणी केली. संतपेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विठ्ठल नगर, प्रदक्षिणामार्ग, जुनी पेठभाग, व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई झोपडपट्टी, लखुबाई झोपडपट्टी, गोविंदपुरा, नदीकाठचे सर्व घाट, नदीवरील 2 पूल अग्निशामक यंत्रणेच्या मदतीने स्वच्छ केले. 

हेही वाचाः मुख्यमंत्री ठाकरे बुधवारी तुळजापुरच्या दौऱ्यावर 

सुमारे 350 सफाई कर्मचारी, दोन फळीचे ट्रॅक्‍टर, दोन जेसीबी, 3 ट्रॅक्‍टरद्वारे ज्या ठिकाणी पुराचे पाणी आले होते, त्या ठिकाणी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुमारे 150 ते 200 टन कचरा उचलण्यात आला. ही मोहीम आठवडा भर सुरू ठेवून स्वच्छता करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली. मलेरिया विभागाचे हिवताप अधिकारी किरण मंजुळ हे मलेरिया विभागकडील 50 कर्मचाऱ्यांच्याद्वारे हातपंप फवारणी करून घेत आहेत.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT