Shahid Bhai Kotwal 
सोलापूर

चित्रपट पाहा अन्‌ दाढी-कटिंग दरात 50 टक्के सवलत मिळवा !

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : नाभिक समाजातील हुतात्मा वीर विठ्ठलराव (भाई) लक्ष्मणराव कोतवाल यांच्या जीवन चरित्रावर व कार्यावर आधारित "शहीद भाई कोतवाल' हा चित्रपट पाहिल्यास शहरातील कुठल्याही सलून दुकानात दाढी व कटिंगच्या दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी घोषणा श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ व सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सवलतीसाठी दाखवा चित्रपटाचे निम्मे तिकीट
"शहीद भाई कोतवाल' हा चित्रपट शुक्रवार (ता. 24) पासून सोलापुरातील आशा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 31 जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता दाखवला जाणार आहे. या चित्रपटातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नाभिक समाजाने व शहीद ऍड. विठ्ठलराव कोतवाल यांनी दिलेल्या योगदानाची माहिती सर्वच समाजातील नागरिकांना व्हावी, यासाठी सर्व नागरिकांनी सहकुटुंब हा ऐतिहासिक चित्रपट पाहावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकाने त्याचे फाडलेले निम्मे तिकीट दाखविल्यास दाढी व कटिंगच्या दरात 50 टक्के सवलत शहरातील सर्व सलून दुकानांमध्ये देण्यात येणार आहे. तसेच सलून कारागिरांना या योजनेनिमित्त लागणारे साहित्य "ना नफा- ना तोटा' तत्त्वावर सवलतीच्या दरामध्ये एसटी स्थानक येथील ओम साई कॉस्मेटिक या दुकानामध्ये मिळणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी हा चित्रपट पाहून सलून सेवेच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष धोत्रे, प्रसिद्धिप्रमुख श्रीकांत राऊत, श्रीनिवास रासकोंडा, सुधीर वड्डेपल्ली, शरणू हडपद, नरहरी रायचूरकर, मनीष गंजाळकर, गोवर्धन कोडपाक, कृष्णा सिंगराल, मोहन जमदाडे, राकेश शिंदगीकर यांनी केले आले.

भाई कोतवालांचा जीवनपट
ब्रिटिशांच्या राजवटीतील अत्याचाराविरुद्ध माथेरानमध्ये ऍड. विठ्ठलराव कोतवाल यांनी ऐतिहासिक लढा दिला. ब्रिटिशांच्या सैन्याचे तंबू व दूरध्वनी यंत्रणा उडविली. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. यामुळे वैतागलेल्या ब्रिटिशांनी ऍड. कोतवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते शहीद झाले. "शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात त्यांचा हा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

सर्व समाजातील नागरिकांनी पाहावा चित्रपट
नाभिक समाजातील स्वातंत्र्यसेनानीवर आधारित हा पहिलाच चित्रपट आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नाभिक समाजाचे व वीर कोतवालांचे मोठे योगदान आहे. या चित्रपटाद्वारे सर्व नागरिकांना वीर कोतवाल यांचे योगदान कळावे, यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी हा चित्रपट सहकुटुंब आवर्जून पाहावा, यासाठी संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी दाढी-कटिंगमध्ये 50 टक्के सवलत ही योजना राबविण्यात येत आहे.
- संतोष धोत्रे, अध्यक्ष, श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ व सेवाभावी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT