pradushan1.jpg 
सोलापूर

अनलाॅकमध्ये कचरा टाकल्याने जलप्रदूषण

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः लॉकडाउनमध्ये घरात अडकलेली माणसे घराबाहेर जाऊ लागली. त्यासोबत शहरातील तलावांच्या काठावर पुन्हा प्लास्टिक कचरा पडत आहे. यामुळे तलाव परिसरात घाण वाढत आहे. 

शहरात कंबर तलाव, सिद्धेश्‍वर तलाव हे दोन प्रमुख जलाशय आहेत. तलाव परिसरात मानवी वस्ती आहे. मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउनने नागरिक घराबाहेर फारसे गेले नव्हते. अगदी तलावाकाठी कोणत्याही प्रकारचा कचरा नव्हता. अनेक वर्षांनंतर केवळ माणसाची वर्दळ कमी झाल्याने तलावाचे पाणी स्वच्छ झाले होते. जलाशयातील पाण्यास नैसर्गिक निळाई अगदी सहजपणे दिसत होती. 

नंतर मागील आठवड्यापासून अनलॉक सुरू झाले. बाजारपेठ उघडल्याने ग्राहकांची गर्दी सुरू झाली. त्यासोबत पॅकिंगचा कचरा पसरण्यास सुरवात झाली. जलाशयाच्या काठाने असलेल्या रस्त्यावर माणसांची वर्दळ वाढली आहे. तलावाच्या काठाने पॉलिथिन बॅग, प्लास्टिकचे ग्लास, कागदाचे तुकडे, प्लास्टिकचे फुटके डबे असा अनेक प्रकारचा कचरा टाकत आहेत. कचरा न टाकण्याच्या सूचना असताना नागरिक कचरा टाकत आहेत. 
प्रत्यक्षात मनपाकडून वाहनाद्वारे शहरात कचरा संकलन सुरू असते. मात्र, तरीही काहीजण तलावाच्या काठावर कचरा आणून टाकतात. त्यामुळे लॉकडाउन उठताच कचऱ्यामुळे तलावाचे काठ बेढब दिसू लागले आहेत. घाणीमुळे जलाशयाचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषणमुक्त जलाशय पुन्हा एकदा कचऱ्याच्या विळख्यात आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

SCROLL FOR NEXT