अक्कलकोट (सोलापूर) : कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील बोरी नदीवरील धरण पावसाळ्यात झालेल्या प्रचंड पावसाने तुडुंब भरून वाहिले होते. 8 फेब्रुवारी रोजी धरणात 93 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात 15 किंवा 16 फेब्रुवारी रोजी धरणातून रब्बी आवर्तन सोडले जाणार आहे. त्यातून धरणाखाली असलेले सर्व सात बंधारे भरून घेतले जाणार आहेत, अशी माहिती उपविभागीय पाटबंधारे अभियंता प्रकाश बाबा यांनी दिली आहे.
पावसाळ्यात झालेल्या मोठ्या पावसाने अद्याप सर्वत्र पाणी साठा मुबलक राहिला आहे. त्यामुळे यावर्षी कुठेच पाणीटंचाई जाणवली नाही. दरम्यान, धरणातील एकूण पाणी साठा 822 दशलक्ष घनफूट पैकी आता 750 दशलक्ष घनफूट म्हणजेच 93 टक्के इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे. आता त्यातून एका आवर्तनात जवळपास 160 ते 170 एमसीएफटी इतके पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे धरणातून 20 ते 22 टक्के एवढा पाणी साठा कमी होणार आहे.
अक्कलकोट, बोरी मध्यम प्रकल्प व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठक आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यात झालेल्या नियोजनानुसार पाणी सोडले जाणार आहे. येत्या 15 ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान हे पाणी धरणातून सोडले जाणार आहे, असे आमदार कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील धरणातून आज पाणी सोडल्यास पूर्व भागातील तालुक्याच्या 40 हून अधिक बोरी नदीकाठच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या आणि नदीकाठच्या शेतीच्या पाण्यासाठी आणखी जादा मदत होणार आहे. यामुळे याखालचे सांगवी, बणजगोळ, मिरजगी, सातनदुधनी, संगोगी, रुद्देवाडी व बबलाद हे सर्व बंधारे या पाण्याने भरले जातील आणि अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद आणि नदीकाठच्या शेतकरी व नागरिकांची पाण्याची टंचाई कोणतीच शिल्लक राहणार नाही.
दरम्यान, वरील सर्व बंधाऱ्यांची दारे व त्यांची स्थिती ही वाईट होती. त्यातून होणारी गळती पूर्ण थांबविण्यासाठी त्यांची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी वाया जाण्याची शक्यता या वेळी राहणार नाही. दरवर्षी या महिन्यात पाणी टंचाई निर्माण व्हायची आणि पाणी सोडण्याची सतत मागणी व्हायची; पण या वेळी धुवॉंधार पाऊस झाल्याने पाणी टंचाई अजिबात जाणवली नाही.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.