fadanvis2.jpg 
सोलापूर

सरकार पडेल तेव्हाच पर्यायी सक्षम सरकार देऊ ः देवेंद्र फडणवीस

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः अनैसर्गिक आघाडीने तयार झालेले राज्य सरकारचे नाकर्तेपण लपवण्यासाठी संजय राऊत यांना आता भाजपच्या विरोधात अग्रलेख लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. राज्य सरकार पडण्याचा मुहुर्ताची वाट पाहत नाही. जेव्हा सरकार पडेल तेव्हा पर्यायी सक्षम सरकार देण्याची भूमिका घेऊ असे मत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 


येथील हेरिटेज लॉन्स सभाग्रहात त्यांची पत्रकार परिषद झाली 

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार हे असंगाशी संग म्हणजे नैसर्गिक आघाडीने तयार झाले आहे. अशा परिस्थितीत जागृत विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत आहोत. सरकार पडण्याचा कोणता मुहूर्त आहे याची वाट आहे पाहत नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. सरकार जेव्हा पडेल तेव्हा उत्तम पर्यायी सरकार देण्याची भूमिका आम्ही बजावणार आहोत. 
महावितरणसह तीन वीज कंपन्याच्या सरकारने केवळ पाच वर्षे चौकशी न करता वीस वर्षाची चौकशी करावी. कारण सर्वात कमी दराने वीज खरेदी आमचे सरकारच्या काळात झाली आहे. सर्वात चांगल्या पद्धतीने महावितरणची सेवा लोकांना आम्ही उपलब्ध करून दिली होती. 
ईडी चौकशी संदर्भात संबंधित यंत्रणा तक्रारीच्या आधारावर काम करते. ज्यांनी कोणी चूक केली नाही त्यांनी ईडीला घाबरण्याचे कारण नसते. 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आम्ही कायम आदर ठेवत असतो. शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ नेते आहेत. त्याबाबत चंद्रकांत पाटलांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला आहे. 
संजय राऊत यांना राज्य सरकार मध्ये कोणते स्थान दिले नाही. त्यामुळे त्यांना भाजपचे विरोधात अग्रलेख लिहिण्याशिवाय पर्याय राहिला नाही. राज्य सरकारचे नाकर्तेपण लपवण्यासाठी अग्रलेख लिहण्याशिवाय त्यांना पर्यायच शिल्लक राहिला नाही असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर श्रीकांचना यन्नम, खासदार डॉ. महासिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT