Welcoming the birth of a girl at Kauthali, the women present were given saplings of various trees 2.jpg 
सोलापूर

कौतुकास्पद ! मुलीच्या जन्माचा असाही सोहळा; रोपटी वाटून केला आनंद साजरा

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कौठाळी (ता.पंढरपूर) येथील ढाणे परिवाराने मुलीच्या जन्माचा आगळ वेगळा कौतुक सोहळा साजरा केला. लक्ष्मीच्या पावलांनी घरी आलेल्या मुलीचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करुन उपस्थित महिलांना विविध वृक्षांची रोपे भेट दिली. तसेच 'बेटी बचाव, बेटी पढाव' असा सामाजिक संदेश ही दिला.

कौठाळी (ता.पंढरपूर) येथील शेतकरी संग्राम व सिमा ढाणे या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. पहिली बेटी, धनाची पेटी असे समजून ढाणे परिवाराने मुलीच्या जन्माचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. ढाणे कुटुंबिय शेतकरी असले तरी संग्राम हे उच्चशिक्षीत आहेत. त्यांनी आपल्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या मुलीच्या जन्माचे असे आगळे वेगळे स्वागत करुन मुलीविषयी समाजात जनजागृती केली.

आजही समाजात मुलगी झाली की नाकं मुरडणारे आई वडील आपण पहातो. मुलगी नको म्हणून तिची गर्भातच हत्या करणारे अनेक महाभाग समाजात वावरताना दिसतात. मुलगी ही दोन्ही घरी दिवा लावते. मुलगा आणि मुलगी असा कोणताही भेदभाव न करता तिला आपल्या मुलासारखे वागवणारे आणि तिचे पालन पोषण करणारेही आई वडील आहेत.

यापैकीच एक असलेल्या संग्राम व सिमा ढाणे यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत करुन मुलीबद्दलचे प्रेम अधिकच वृध्दींगत केले आहे. दोन दिवसापूर्वी ढाणे परिवाराने मुलाच्या स्वागतासाठी विविध रंगीबेरंगी फुलांच्या पायघड्या घालून तीचे स्वागत केले.  गावातून ढोलताशाच्या गजरात मिरवणूकही काढली. घरच्या मंडळींनी त्या चिमुकल्या मुलीच्या पायांचे ठसे उमवट गृह प्रवेश दिला.

फुग्यांची आणि विविध फुलांची घरात साजवट केली होती. आलेल्या मित्र मंडळी आणि महिलांना मिष्ठान्न् दिले. त्याचबरोबरच मुलीच्या जन्माची आठवण म्हणून प्रत्येकाला एक रोप ही भेट दिले. संग्राम ढाणे यांनी आपल्या मुलीच्या जन्माच्या निमित्ताने  पर्यावरण संतुलन आणि वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेशही दिला आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचे परिसरात कौतुक  केले जात आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT